शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०४ ऑगस्ट २०२२
कोकमठाण येथे सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ..!!
अहमदनगर : कोकमठाण येथे सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहास लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. २ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट दरम्यान पार पडणार्या सप्ताहाचा महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून प्रारंभ करण्यात आला.
🌸 संत पुजनाने प्रारंभ.....!!
यावेळी कोकमठाण येथे हनुमान मंदिरात पूजन करण्यात आले. तसेच पुणतांबा फाटा ते सप्ताह स्थळापर्यंत महंत रामगिरी महाराजांची रथात बसून ढोल तश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. भजन मंडपात अखंड यज्ञ प्रज्वलित करून, सद्गुरु गंगागिरीजी महाराज, ब्रम्हलिन नारायणगिरीजी महाराजांसह सर्व संताच्या प्रतिमांचे पुजन करुन तसेच विणापुजन करुन पंचपदी गायनाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला.
यावेळीसंत रमेशगिरी महाराज, आमदार आशुतोष काळे, विवेक कोल्हे, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष सुधारक रोहम, कार्याध्यक्ष संभाजी रक्ताटे, सचिव शरद थोरात, राजेश परजणे, वसंत लोंढे, रंगनाथ लोंढे आदी उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

