प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
स्व नानाभाऊ ऊगलमुगले यांच्या स्मरणार्थ श्रीमती सविता उगलमुगले यांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. संजय राऊत यांच्या कडे नेब्युलायझर भेट दिले . उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना आजारपणात वाफ घेण्यासाठी इलेक्ट्रिक नेब्युलायझरचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.
केज येथिल न्यायालयात कर्मचारी आसणाऱ्या श्रीमती सविता उगलमुगले यांनी स्व नानाभाऊ उगलमुगले वडलांच्या स्मरणार्थ केज येथील जिल्हा उपरुग्णालयात आजारी व्यक्ती च्या उपयोगाला पडावी अशी वस्तू देण्याचा माणस करून इलेक्ट्रिक नेब्युलायझर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन डॉ. संजय राऊत यांच्या कडे भेट म्हणून दिले यावेळी डॉ. विशाल करपे , लघु वृत्तपत्र संघाचे प्रदेश अध्यक्ष प्रदिप कुलकर्णी , पत्रकार धनंजय कुलकर्णी , दिगंबर राऊत , श्रीकृष्ण नागरगोजे आदी उपस्थित होते .

