अमरावती = दिल्ली येथे 31जुलै रोजी, वॉलेट लघुचित्रपट महोत्सव ऑनलाईन पद्धतीने पार पडला. संपूर्ण देशातून 7102 चे वर शॉर्ट फिल्म ने या स्पर्धेत भाग घेतला होता.त्यामध्ये अमरावती येथून मै झुकेगा नही, फुग्गा,एनसीडी व लाल खून लघुचित्रपट पाठविण्यात आले होते.आणि पुरस्काराची परंपरा कायम ठेवत चारही शॉर्ट फिल्म ला चार पुरस्कार प्राप्त झाले.
मै झुकेगा नही या क्षयरोगावर आधारित फिल्म ला बेस्ट फिल्ममेकर, फुग्गा या एड्सवर आधारित लघुपटाला बेस्ट सोशल फिल्म, असांसर्गिक आजारावर आधारित एनसीडी या फिल्म ला व मासिक पाळीवर आधारित लालखून या फिल्मला बेस्ट ज्युरी मेन्शन पुरस्कार प्राप्त झाले.
चारही लघुचित्रपटाचे कथा पटकथा संवाद व दिगदर्शन धर्मा वानखडे यांनी केले आहे. एनसीडी फिल्म च्या निर्माती अर्चना चौरपगार पाटील असून, फुग्गा फिल्म च्या निर्माती ज्योती वानखडे,लाल खून चे निर्माते अनंत वासनिक तर मै झुकेगा नही फिल्म चे निर्माते डॉ दिनेश अंभोरे हे आहेत. फिल्म चे संकलन भारत वानखडे यांचे असून छायांकन इरफान शेख,अक्षय खल्लरकर यांचेआहे.फुग्गा फिल्म चे सहदिगदर्शन निलेश ददगाल व सागर भोगे यांनी केले आहे.
फिल्म चे कार्यकारी निर्माता, सुरेंद्रकुमार आकोडे, राहुल पाटील,चंदू काळे हे असून फिल्म चे व्यवस्थापक आशिष सुंदरकर, प्रफुल्ल कोठेकर आर्यन वानखडे हे आहेत.वेशभूषा व केशभूषा विनय भगत यांनी केली असून लघुचित्रपटात धर्मा वानखडे,सपना बटुले, दिनेश इंगोले,सोनाली सरदार, डॉ दिनेश अंभोरे,निलेश कथे,वसंत उके, प्रीती सोनटक्के,भारत वानखडे,अक्षय नगराळे,यांच्यासह बालकलाकार म्हणून प्रणव साबळे व वंशिका इंगळे यांनी भूमीका निभावल्या आहेत.

