shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळ्याचे तडफदार पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची बदली . . .


करमाळ्याचे नवीन पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २९ / करमाळा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब यांची बदली झाली त्यांचा निरोप समारंभ तसेच करमाळा पोलीस स्टेशन चे नूतन पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे साहेब यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने पोलीस निरीक्षक आदरणीय कोकणे साहेब व नूतन पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे साहेब यांचा फेटा, हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यानिमित्त वेगवेगळ्या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी मनोगत व्यक्त करून दोघांचेही अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.      यावेळी राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे करमाळा शहराध्यक्ष ऋषिकेश शिगची, उपाध्यक्ष आरशान पठाण, यश कांबळे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close