श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : येथील क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,
यावेळी श्री. बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना हसा खेळा पण शिस्त पाळा असा महत्वाचा सल्ला दिला.
हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, क.जे.सोमैया हायस्कूलचे चेअरमन संजय छल्लारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यासोबतच महाविद्यालयाचे चेअरमन विजय नगरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्याही दिल्या,यावेळी सामाजिक कार्यकर्ते माणिकराव जाधव, प्राचार्य विठ्ठल भांगरे सर,विभाग प्रमुख प्रा. शेटे योगेश, प्रा.श्री.राऊत अविनाश, प्रा सय्यद शेरअली आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जाधव दिपाली व प्रा .कुमावत सुवर्णा यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.जाधव चंद्रकला यांनी केले.अशा प्रकारे हसत खेळत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

