shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाऊसाची परवा न करता प्रसूती साठी आरोग्य कर्मचारी दारात ; आरोग्य विभागाची अतुलनीय कामगिरी

 प्रतिनिधी : शिवा म्हस्के

दहिगाव :२८ /  असं म्हटलं जातं, की प्रसूती म्हणजे महिलेचा दुसरा जन्म असतो. ही वेळ गरोदर महिलेसाठी अत्यंत कठीण आणि तेवढीच घातकही ठरू शकते. त्यामुळे प्रसूती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी होणं अत्यंत गरजेचं आहे.

 नगर तालुक्यातील दहिगाव येथील गावा पासुन दिड ते दोन किलोमीटर अंतरावर एक डोंबारी वस्ती आहे . हे कुटुंब अत्यंत गरीब कुटुंब आहे. या ठिकाणच्या एका महिलेला प्रसूती  वेदना सुरू झाल्या होत्या .महिलेचा पती विकास वाघ यांनी मध्यरात्री गावातील आशा सेविका  आशा जाधव यांना तातडीने संपर्क केला . पत्नीला प्रसूती वेदना होत आहे याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन  बाहेर पडणारा पाऊस चालु असताना देखील याचा विचार न‌ करता पाऊसात भिजत घटनास्थळी आशा सेविका पोहचल्या . शिराढोण आरोग्यवर्धिनी उपकेंद्रच्या अंतर्गतचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ . सुर्यकांत यादव व आरोग्य सेविका मनीषा बन्सोड यांना फोन करून सविस्तर माहिती दिली. तसेच आपत्कालीन १०८ ॲम्बुलन्स ला फोन केला . परंतु प्रसूती वेदना वाढलेल्या होत्या आशा जाधव यांनी घटनास्थळावरून महिलेच्या परिस्थीत बद्दल माहिती दिली‌ . डॉ सुर्यकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेची सुखरुप प्रसूती केली . तेवढ्या वेळात आरोग्य सेविका व समुदाय आरोग्य अधिकारी दहिगाव येथील डोंबारी वस्तीवर पोहचुन   बाळांची आणि आईची तपासणी करून बाळांची नाळ कापली व बाळाला आई पासून वेगळे केले. 




प्रसूती सर्व प्रकीया पार पाडल्या तसेच प्रसूती नंतरच्या काळजी बदल सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच बाळाचे लसिकरण बाबतीत माहिती दिली नियमित लसीकरण करून घेण्यास सांगितले. हे आरोग्य विभागाचे सहकार्य पाहुन विकास वाघ व  वाघ आई यांना धन्यवाद व आभार व्यक्त करण्यासाठी शब्द हि नव्हते. या कर्मचार्याचे  धन्यवाद कसे मानु असे त्यांच्या कडे शब्द नव्हते परस्थिती अत्यंत गरीब  अशा परस्थिती आम्हाला घरी येऊन आरोग्य सेवा पुरवली  त्यांमुळे वाघ कुटुंब व गावकरी भारावून गेले होते.असे कर्मचारी सत्कारास पात्र ठरतात हे नक्की...
close