चिखली येथे दत्तात्रय भरणे यांचे हस्ते राजेंद्र अर्जुन यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन.
इंदापूर प्रतिनिधी:चिखली गावचे इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर अर्जुन यांचे अभिष्टचिंतन दिनानिमित्त माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांचे शुभहस्ते व माजी जिल्हा परिषद सदस प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान चिखली यांच्या वतीने शिवशंभो चारिटेबल ट्रस्ट आणि कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून राजेंद्र अर्जुन यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी चिखली गावचे सरपंच विजय अर्जुन, शिवाजी अर्जुन, उत्तम खोमणे, विलास शेंडगे, पोलीस पाटील राजिव गायकवाड , बाळासाहेब रूपनवर, मधुकर खरात, महादेव कवळे, हसिम मुलाणी, ज्ञानराज डोंबाळे, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास अर्जुन, सचिन अर्जुन, नामदेव जाधव, रामभाऊ अर्जुन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक ढवळे, धनंजय माने, दिलीप पांढरे, दगडु अर्जुन, तेजस निकम आदी सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी ऋतेश अंकुश कवळे
योगा नॅशनल फेडरेशन वेरूळ येथे झालेल्या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळाला त्याबद्दल दत्तात्रेय भरणे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

