shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कालठण नंबर १ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महादेव मांढरे व शशिकांत पाटील यांनी केले शालेय साहित्याचे वाटप.

कालठण नंबर १ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महादेव मांढरे व शशिकांत पाटील यांनी केले शालेय साहित्याचे वाटप.

आजादी का अमृत महोत्सव १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:आजादी का अमृत महोत्सव १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी   कालठण नंबर १ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महादेव सोपान मांढरे व शशिकांत बबन पाटील यांनी ११०  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून पॅड  वाटप केले. सदर पॅड चा उपयोग हा विद्यार्थ्यांना लिखाणासाठी वही खाली सपोर्ट मिळावा म्हणून होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची लेखन शैली सुधारते.
एकाच वेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी लालासाहेब जगताप माजी सरपंच, हनुमंत जाधव संचालक कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, शालेय कमिटी अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे,  डॉक्टर लक्ष्मण सपकळ, अण्णासाहेब कोळेकर ,महादेव मांढरे, शशिकांत पाटील, राजेंद्र जगताप गुरुजी मुख्याध्यापक, घुले गुरुजी, बोराटे गुरुजी ,राऊत मॅडम, मेजर मारुती भोई, तानाजी सपकळ, संतोष सपकळ, महादेव भोई, दादासाहेब गलांडे ,संतोष कोळेकर ,विजय पाडुळे, तुकाराम पांडुळे ,हरी कुंभार ,वैभव गटकुळ ,किंचक जगताप,संतोष जगताप माजी उपसरपंच, विजय जेडगे,  नागनाथ गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.
close