shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहरातील धर्मवीर संभाजी महाराज मित्र मंडळाच्या गणेशाच्या मूर्तीची प्रदीप गारटकर यांच्या हस्ते स्थापना.

इंदापूर शहरातील धर्मवीर संभाजी महाराज मित्र मंडळाच्या गणेशाच्या मूर्तीची प्रदीप गारटकर  यांच्या हस्ते स्थापना.

 मंडळाच्या वतीने  संस्थापक सदस्य स्व.देविदास कुंभार व स्व.दिपक क्षिरसागर  यांना  श्रद्धांजली वाहण्यात आली

यंदाच्या वर्षीची विसर्जन मिरवणूक रद्द करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार - विश्वस्त श्रीधर बाब्रस व अध्यक्ष विनायक बाब्रस .

इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील धर्मवीर संभाजी महाराज मित्र मंडळाची यंदाच्या वर्षीची गणेशाची स्थापना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे हस्ते करण्यात आली. सर्वप्रथम मंडळाचे संस्थापक सदस्य स्व.देविदास कुंभार व स्व.दिपक क्षिरसागर यांना मंडळाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली व मंडळाचे वतीने यंदाच्या वर्षीची विसर्जन मिरवणूक रद्द करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे मंडळाचे विश्वस्त श्रीधर बाब्रस व अध्यक्ष विनायक बाब्रस यांनी जाहीर केले.
                  यावेळी मा. उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, मा. नगराध्यक्ष अशोक (नाना) गाणबोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा चिटणीस बाळासाहेब व्यवहारे, निखिल बाब्रस, भारतीय जनता पक्षाचे माऊली वाघमोडे इ. प्रमुख पाहुणे उपस्थित होते. 
                      यावेळी मंडळाचे कार्यकर्ते सर्वश्री मनोज भापकर, अनिल चव्हाण, रमेश बनसोडे, समीर दुधनकर, दत्तू शिंदे, हर्षवर्धन कांबळे, योगेश गोरे, लक्ष्मण घुगे, शब्बीर शेख, दयानंद ठाकुरदास इ. बहुसंख्येने उपस्थित होते. अशी माहिती विश्वस्त श्रीधर बाब्रस यांनी दिली.
close