शिर्डी । प्रतिनिधी :-
मराठीचा जाज्वल्य इतिहास समाजासमोर आणण्यासाठी स्वामी प्रकाशन,मुंबई आणि वसंतदादा मल्टीस्टेट,शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या श्री साईंच्या शिर्डीत "मराठी आठव दिवस" एका मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
यावेळी वर्धापन दिनानिमित्त वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेचे कार्य आपल्या मराठी माणसांसाठी समर्पित केल्याचे गौरवोदगार संस्थेचे चेअरमन श्री. मुकुंद सिनगर यांनी व्यक्त केले. आज 27 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता शिर्डी येथील साई पालखी निवारामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणात शेकडो सभासदांच्या उपस्थितीत "My बोली साजिरी" हा मराठीची श्रीमंती दाखवणारा अभिवाचनात्मक कार्यक्रम मुंबई येथील साईभक्त लेखक दिग्दर्शिका मेघा विश्वास यांच्यासह 5 कलाकारांनी अतिशय उत्साहात सादर केला.
सर्वप्रथम शिर्डीतील नगराध्यक्ष मा. शिवाजी भाऊ गोंदकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. मुकुंद सिनगर यांनी प्रास्ताविक करत प्रमुख मान्यवर व सर्व मराठी रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक स्वागत केले. यानंतर सर्वच कलाकारांनी उत्तम सादरीकरण करत अतिशय जोशाने मराठीचा उलगडा करत करत इंग्रजीच्या विळख्यात सापडलेल्या समाजाला मराठीची आठवण करून देणारा दर्जेदार अभिनय करत कार्यक्रम सादर केला. यावेळी एकही सभासद कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आपल्या जागेवरून विचलित झाला नाही हे विशेष. यावेळी अभिवाचनात नेमके मराठी पदार्थाचे व मराठी माणसाच्या खवय्येगिरीचे वर्णन सादर करत असताना सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले असताना नेमकेच नाश्ता वाटप सुरु झाल्याने वेगळ्या अनुभूतीचा सर्वांनाच सुखद धक्का बसला आणि एकच हशा पिकला.
यावेळी शिर्डी नगरीचे मा.नगराध्यक्ष श्री. शिवाजी भाऊ गोंदकर, संस्थेचे चेअरमन श्री. मुकुंद भाऊ सिनगर, निमगाव ग्रामपंचायतचे सदस्य श्री. भानुदास पा. कातोरे, संस्थेचे जेष्ठ सभासद सर्व श्री. प्रभाकर भाऊ बेलोटे, श्री. ईश्वर तारकसे, श्री. दत्तात्रय घाडगे, श्री. प्रताप पाडेकर, श्री. रविंद्र सोनवणे, श्री. दत्तात्रय सिनगर, श्री. गणपत अण्णा गोंदकर, श्री. अशोक आप्पा काजळे, श्री. भागवत चोळके, सौ. सारिका सिनगर, सौ.ज्ञानेश्वरी नागरे, सौ. शीतल शिंदे, सौ. कोमल संसारे, सौ.सोनी बोंबे, यासह शिर्डी शहर व पंचक्रोशीतील बहुसंख्य मराठी बांधव व संस्थेचे सभासद उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेचे कर्मचारी सर्व श्री. गणेश वाळुंज, अनिल कापसे, श्याम सापिके, आशुतोष शिंदे, अमोल आदमने आदींनी खुप मेहनत घेतली. सूत्रसंचालन श्री. राम गायकवाड सरांनी केले तर शेवटी मुकुंद सिनगर यांनी आभार मानले.

