shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

झगडेवाडी सरपंच सौ रुपाली झगडे यांच्या नियोजनाखाली ३०० महिला भगिनींनी घेतला पंढरीतील विठोबाच्या दर्शनाचा लाभ.

झगडेवाडी सरपंच सौ रुपाली झगडे यांच्या नियोजनाखाली  ३०० महिला भगिनींनी घेतला 
पंढरीतील विठोबाच्या दर्शनाचा लाभ.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्याचे  आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप  गारटकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत झगडेवाडीच्या वतीने गावच्या सरपंच सौ रुपाली झगडे यांच्या नियोजनाखाली झगडेवाडी गावातील जवळपास 300 महिला भगिनींना पंढरपूर दर्शनाचा लाभ दिला. यामध्ये महिलांना झगडेवाडी पासून मोफत बसणे पंढरपूरला नेण्यात आले. तसेच या सर्व महिलांना चहा, नाष्टा ,जेवण याचे तंतोतंत नियोजन करण्यात आले.हे नियोजन करण्यासाठी डॉक्टर दादाराव झगडे, सतीश अभंग, श्रीकांत मोरे, जालिंदर बोराटे, संतोष राजगुरू, नवनाथ अभंग, नवनाथ मोरे, तसेच सांप्रदायातील राम महाराज अभंग, महादेव झगडे ,उत्तम झगडे ,राहुल झगडे, मच्छिंद्र झगडे तसेच गावातील सर्व भजनी मंडळ व गावातील सर्व युवकांनी खूप मोठे सहकार्य केले. या सहलीच्या पूर्ततेनंतर पांडुरंगाच्या दर्शनाने सर्व महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होताना पाहायला मिळाले.
close