प्रतिनिधी : निरज चांगटे
कोरोना विषाणूमुळे अनेक निर्बंध घालण्यात होते . गेल्या दोन वर्षांनंतर गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय भापकर यांनी आवाहन केले आहे.
नगर तालुका हद्दीतील सर्व गणेशभक्तांनी आपल्या गणेश मूर्ती नियोजित केलेल्या विसर्जन केंद्रावरच द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेश मूर्ती संकलन केंद्रावर देण्यापूर्वी घरातच आरती, पूजा करावी. गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या गणेश मूर्तींचा वापर करावा. कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढताना ध्वनी प्रदूषण टाळावे. गणेश मंडळांनी सार्वजनिक वाहतूक ठप्प होईल असे मांडव घालू नये. तसेच मंडळांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी योग्य खबरदारी घ्यावी. पीओपीची मूर्ती घेणे टाळावे. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येत आहे.
" नागरिकांनी दुकानदार, व्यावसायिक यांच्याकडून श्री गणेशाची मूर्ती खरेदी करताना मूर्ती संपूर्ण मातीची किंवा शाडू मातीची आहे, याची खात्री करूनच मूर्ती खरेदी करावी. पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना घरोघरी करण्यात यावी व गणेशोत्सव आनंदात साजरा करावा.. "
..... _संजय भापकर , गुंडेगाव.ता.नगर ( निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य)_

