रमेश जेठे (सर) अहमदनगर :
मेहकर जि.बुलढाणा येथील धडाडीचे अभ्यासू पत्रकार आणि "दैनिक मेहकर टाईम्स"चे वृत्त संपादक श्री.उद्धव श्रीराम फंगाळ यांची "स्वाभिमानी संपादक सेवा संघ" या वार्ताहर - संपादकांच्या राज्यव्यापी संस्थेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली गेली असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांनी सांगितले,
स्वाभिमानी संपादक सेवा संघ ही राज्यव्यापी संस्था नवोदित वार्ताहर,संपादक यासोबतच मुद्रण क्षेत्रातील सर्वच श्रमीकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने प्रयत्नशील असते, प्रत्येक्ष, अप्रत्येक्ष नवोदित संपादक, वार्ताहर यांच्यावर होणारे अन्याय अत्याचारास वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणे,तसेच नवोदित वार्ताहर, संपादक यांच्यासाठी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करुन शासन दरबारी त्यांना येणाऱ्या विविध आडचणी सोडविणेकामी सातत्याने पुढाकार घेते,तसेच विविध लघू प्रसार माध्यमे आणि मुद्रण क्षेत्रातील गरजू श्रमिकांसाठी विविध समाजाभिमूख उपक्रम राबवून त्यांच्या आडीआडचणी समजून घेत त्यांना आधार देण्याचे उपक्रम सातत्याने राबवत असते.
श्री.फंगाळ यांची विविध प्रसार माध्यमांमधील अनुभव आणि कामे पाहता,तथा सर्वसमावेशक आणि सर्वांना उचित न्याय देण्याची भुमिका पाहता त्यांची या पदावर नियुक्ती केली असल्याचेही श्री.शेख यांनी सांगितले.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक उपाध्यक्ष माणिकराव जाधव,सचिव ऍड, मोहसिन शौकत शेख, खजिनदार अय्युबभाई पठाण, कार्याध्यक्ष अनिल म्हात्रे, सदस्य अफजल मेमन या सोबतच महाराष्ट्र संपादक परिषदेचे प्रकाशराव कुलथे, सिटिझन्स जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष नागेशभाई सावंत, प्रदेश महासचिव राजेंद्र नारायणे, महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघाचे अध्यक्ष विजयराव नगरकर,महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकतअली शेख,अखिल वडार समाज संघाचे रमेश जेठे (सर),दैनिक मेहकर टाईम्स चे हारुनभाई सय्यद ऍड.मोईनभाई सय्यद, दैनिक स्नेहप्रकाश चे स्वामीराज कुलथे, दै.ताजी खबरे चे अलिम शेख, दैनिक साईदर्शनचे जितेश
लोकचंदानी,सा.भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चे शाह मुश्ताकअली, दैनिक सार्वमंथन चे अनिल कोळसे, दैनिक कॉमन न्यूज चे अल्ताफ शेख, दैनिक जलभूमीचे बाळासाहेब जाधव, एस न्यूज मराठी चे जयश सावंत,शिर्डी एक्सप्रेस चे विशाल जेठे, खरे सव्वाशेर चे लियाकतखान पठाण,पुर्व कल्पनाचे सोमनाथ जानराव, माहिती व कायदा चे असलमभाई सय्यद,अमन सय्यद, क्षितिज समाचार चे गोरखदादा गवारे,पत्रकार संदिप आसने, आर.के.न्यूज चे राहुल कोळगे,समता फाऊंडेशनचे सरताज शेख,आदींनी अभिनंदन केले आहे.

