shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहिल्यादेवी होळकराचें अनुकरण करून स्त्रियांनी समाजकारण ,राजकारण, उद्योग व्यवसाय या सर्व ठिकाणी आपला ठसा उमटवला पाहिजे - अनिताताई खरात.

 अहिल्यादेवी होळकराचें अनुकरण करून स्त्रियांनी समाजकारण ,राजकारण, उद्योग व्यवसाय या सर्व ठिकाणी आपला ठसा उमटवला पाहिजे - अनिताताई खरात.


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तेजपृथ्वी ग्रूपच्या  अध्यक्षा अनिताताई खरात यांनी केले अभिवादन. 

इंदापूर प्रतिनिधी:आजच्या स्त्रीने अहिल्यादेवी होळकराचें अनुकरण करून स्त्रियांनी समाजकारण ,राजकारण, उद्योग व्यवसाय या सर्व ठिकाणी आपला ठसा उमटवला पाहिजे असे अनिताताई खरात यांनी इंदापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्यांनी मत व्यक्त केले. 
आज इंदापूर येथे तेजपृथ्वी ग्रूप च्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात यांनी  राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस  पुष्पहारअर्पण करून अभिवादन केले.
 यावेळेस अनिता खरात म्हणाल्या की, अहिल्याबाई होळकरांचे कार्य हे अविस्मरणीय आहे. ज्या काळी स्त्रीला चूल आणि मूल एवढाच अधिकार होता. त्याकाळी माझ्या मातेने बालविवाह बंदी कायदा सती प्रथा बंदी असे कायदे केले.    वेळप्रसंगी हातात तलवार घेतली ,राघोबा सारख्या बलाढ्य दुश्मनाला ही गार केले.  अशा मातेला मी आज अभिवादन करते. आज विचार केला तर आपल्याकडे सर्व सुख सुविधा असताना आजही स्त्रियांना म्हणावं तेवढे स्वातंत्र्य नाही आणि ज्यांना आहे त्या घराबाहेर पडायला तयार नाहीत. आजच्या स्त्रीने अहिल्यादेवी होळकराचें अनुकरण करून स्त्रियांनी समाजकारण ,राजकारण, उद्योग व्यवसाय या सर्व ठिकाणी आपला ठसा उमटवला पाहिजे.
close