shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आडसूळ टेक्निकल कॅम्पस च्या महारोजगार मेळाव्यात ४७८ विद्यार्थ्यांना मिळाली नोकरीची संधी


प्रतिनिधी : आसावरी वायकर

चास: १९ /  साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे आडसूळ टेक्निकल कॅम्पस मध्ये १८ ऑगस्ट २०२२ रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .

 या महारोजगार मेळाव्यासाठी पुणे, चाकण, शिरवळ, रांजणगाव, सुपा, अहमदनगर, औरंगाबाद, मुंबई, या परिसरातील ६० हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला . ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कौशल्य विकासासाठी विविध विषयांवर सहभागी झालेल्या नामांकित कंपन्यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्धजी आडसूळ, उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ आडसूळ , प्राचार्य डॉ. प्रदीप  एम पाटील, उपप्राचार्य प्रा. किशोर जाधव  व  विविध विभाग प्रमुख यांच्यासोबत चर्चासत्र आयोजित करून संस्थेसोबत या सर्व नामांकित कंपन्यांनी सामंजस्य  करारनाम्यावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या व भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना या स्पर्धात्मक युगामध्ये  स्वतःचा विकास करून नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले.

अहमदनगर व लगतच्या जिल्ह्यातून आयटीआय, डिप्लोमा ,इंजीनियरिंग, सायन्स ,कॉमर्स ,मॅनेजमेंट व इतर सर्व विभागातील एकूण २२४९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केली होती. यापैकी ५६४ विद्यार्थी १८ ऑगस्ट २०२२ रोजी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी टाटा ग्रुप महाराष्ट्राचे एच आर विभागाचे अध्यक्ष माननीय श्री राहुल पाटील व एअरटेल आणि आयबीएम चे रिक्रुटर सुमित यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरीची हमी दिली .

 त्याचबरोबर प्राचार्य डॉ प्रदीप एम पाटील यांनी आलेल्या सर्व एच आर यांचे स्वागत करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मुलाखतीस सामोरे कसे जावे याचे धडे देऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ यांनी मार्गदर्शन करत असताना, माझ्या संस्थे बरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील विविध संस्थेतील विद्यार्थ्यांना मदत व्हावी हाच सामाजिक मानस असल्याचे सांगितले. याचप्रमाणे दरवर्षी हजारोंच्या  संख्येने विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले.

या महारोजगार मेळाव्या दरम्यान टेक्नो ग्राफ, इंदुरान्स लिमिटेड, इंदुरान्स टेक्नॉलॉजी, कायझन, एम टेक, अमेरिकन एक्स एल,धूत ट्रान्समिशन, हायटेक, रायडर, कायनेटिक ग्रीन, इटऑन, एचडीएफसी लाइफ, टाटा स्टाईव्ह, आयटीसी, टाटा व्हील, एक्साइड, ॲटजॉईन, संजीव ऑटो या नामांकित कंपन्यांनी ४७८ विद्यार्थ्यांची निवड केली. यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महारोजगार मेळाव्याच्या  नियोजना अंतर्गत संस्थेतील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित काम पाहिले. संगणक इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. साजिद खान यांनी महारोजगार मेळाव्याचे समन्वयक म्हणून काम पाहिले. ह्या मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. पूजा साठे मॅडम व कपाटे मॅडम यांनी केले. एमबीए विभाग प्रमुख प्रा .सुहास पाखरे यांनी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले.
close