shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आडसूळ टेक्निकल कॅम्पस नगर येथे भव्य महारोजगार मेळाव्याचे १८ ऑगस्ट रोजी आयोजन

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : १५ /  साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या आडसूळ टेक्निकल कॅम्पस चास, अहमदनगर येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्थेचे संस्थापक माननीय अनिरुद्ध  माणिक आडसूळ आणि प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील यांच्या  संयुक्त विद्यमानाने आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत  समाजासाठी आणि  सामाजिक बांधिलकी राखण्यासाठी अहमदनगर आणि जवळच्या जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील केवळ अभियांत्रिकीच नव्हे तर सर्व शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व पदवीधर  युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात आलेले आहे.

  या मेळाव्यामध्ये सर्व क्षेत्रातील औद्योगिक (आय.टी.आय.) अभियांत्रिकी पदविका, पदवी, पदव्युत्तर, मॅनेजमेंट त्याचबरोबर कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक‌, कृषी व औषध निर्माण  पदविका, पदवीधर व पदव्युत्तर युवकांनी नाव नोंदवण्याचे आव्हान संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे. या महारोजगार मेळाव्यामध्ये पुणे, मुंबई, बेंगलोर, चाकण, रांजणगाव, शिरवळ , सातारा, सुपा, अहमदनगर व औरंगाबाद येथील नामांकित ५८ बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये प्रामुख्याने आयटी क्षेत्रातील कंपन्या, मोबाईल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक व्हेईकल, बॅटरीज बनवणाऱ्या, कम्युनिकेशन क्षेत्रातील, बांधकाम खात्यातल्या तसेच फार्मासिटिकल  क्षेत्रातील अग्रेसर कंपन्यांनी प्रतिसाद  दिलेला आहे.

आडसूळ टेक्निकल कॅम्पसच्या माध्यमातून विविध गुणवंत विद्यार्थी घडत असून महाविद्यालयातील बरेचसे  विद्यार्थी परदेशातही नोकरी करत  आहेत तर, काही विद्यार्थ्यांचे पेटंट रजिस्टर झालेले आहेत व ते यशस्वी उद्योजक बनलेले आहे. संस्थेने विद्यार्थ्यांचे कौशल्य गुण विकास करण्याबरोबरच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात रोजगार महामेळाव्याच्या माध्यमातून  मोठे पाऊल उचलले आहे.

संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध आडसूळ यांचे सर्व स्तरावरील बहुसंख्य विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचे अनेक दिवसांचे स्वप्न येत्या १८ ऑगस्ट २०२२ रोजी प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील व त्यांच्या सहकार्यांमुळे साकार होत आहे.
तरी सर्व विद्यार्थी व युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आव्हान संस्थेकडून करण्यात आलेले आहे.

 अधिक माहितीसाठी www.adsulstechnicalcampus.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. महारोजगार मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करावयाची असून त्याची लिंक खालील प्रमाणे आहे https://forms.gle/Sv2hL4jk7mvB7Cwc6 तरी सर्व गरजूंनी याचा लाभ घ्यावा.
close