shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आष्टीचा नवरदेव करमाळयाची नवरी साखरपुड्याला आले अन विवाह करून गेले**या विवाहाचे सर्वत्र कौतुक



प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३१/ करमाळा शहरातील मंगळवार पेठ येथील संतोष मारुती यादव यांची मुलगी सिद्धी हिचा २९/८/२०२२ रोजी साखरपुड्यामध्ये अचानक लग्न सोहळा आंनदात पार पडला. मुलाकडील मंडळी सुपारी आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आले होते लग्न करून मुलीला घेऊन गेले. 

संतोष यादव यांच्या मुलीचे लग्न त्यांच्या बहिणीच्या मुलाशी करायचे ठरले होते लग्नाची बोलणी करुन साखरपुडा करण्यासाठी आले होते. पंढरपूर जवळ आष्टी गाव येथील नवरदेव असुन सुपारी फोडून लग्नाचे बोलणी करून साखरपुडा करणार होते. पण अचानक विचार बदलला व लग्न करून नवरीला घेऊन गेले. या लग्नामुळे दोन्ही परिवाराकडील  अनावश्यक खर्च टळला. साखरपुड्यासाठी भरपूर लोक जमले होते जेवणही उत्तम प्रकारे बनवण्यात आले होते सुरुवातीला मुलीचे वडील लग्नासाठी तयार होते पण घरातील काहीजण तयार नव्हते तेव्हा उपस्थित जाणकार मंडळींनी मध्यस्थी करून हे लग्न करण्यास दोन्ही परिवारांना तयार केले व एक तासात लग्नाची सर्व तयारी करण्यात आली आणि अगदी व्यवस्थित रित्या हा लग्न सोहळा संपन्न झाला.

१०:३० ला नवरा मुलाकडचे आले ११:३० ला सुपारी फुटली १२ :३० ला साखरपुडा झाला आणि अचानक लग्न करण्याचा निर्णय झाला आणि विवाह सोहळा संप्पन झाला. या विवाह सोहळयाला विजय लावंड, दिनेश राठोड, सचिन गायकवाड, डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील, डाॅ.रोहन जाधव पाटील, व्ही.आर.  गायकवाड अंधश्रद्धा निर्मूलन समिती नगर शहर कार्याध्यक्ष, उमेश निंबाळकर, ज्योतीराम लावंड, समस्त लावंड परिवार व समस्त यादव परिवार आणि इतर नातेवाईक उपस्थित होते सर्वांनी वधू वरास भरभरून आशीर्वाद दिले. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विवाह केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
close