प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ६/ बेकायदेशीर ऱित्या विनापरवाना चोरुन वाळु वाहतूक करणाऱ्याला वाहनासह करमाळा पोलीसांनी पकडले आहे करमाळा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या वेळी टाकळी ते भिगवण रस्त्यावर हा वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी एक पथक त्या दिशेने रवाना केले. भीमा नदीतील पात्रातील वाळू चोरी करून वाहतूक करीत असताना एका व्यक्तीस टाकळी ते भिगवन जाणाऱ्या रस्त्यावर कोंढार चिंचोली भागातून जात असताना एकाला पोलिसांनी पकडले. त्याच्या कडुन तीन ब्रास वाळु व ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला मागील काही दिवसापासून चोरुन वाळु नेली जात असल्याबाबत माहीती पोलिसांना मिळाली त्यानंतर ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सहा ऑगस्ट रोजी पहाटे चारच्या सुमारास कोंढार चिंचोली तालुका करमाळा गावचे हद्दीत टाकळी ते भिगवण जाणाऱ्या रोडवर कोंढार चिंचोली गावात जाणाऱ्या चौकात सतीश मंजुळे रा. केतुर क्रमांक २ ता. करमाळा याच्या सहा चाकी ट्रक मध्ये सुमारे तीन ब्रास वाळू ही मलठण जिल्हा पुणे येथून भीमा नदीच्या पात्रातून चोरून आणली होती बेकायदेशीर ऱित्या विनापरवाना वाहतूक करत असताना त्याला करमाळा पोलिसांनी पकडले. सदरची कारवाई पोलिस हवालदार मारुती रणदिवे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप व सिद्धेश्वर लोंढे यांनी केली आहे.

