shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृष्णाची मैत्रिण राधेचा मृत्यू कसा झाला..? यामागचे रहस्य काय होते..??

राधा- कृष्ण प्रेम जगात अमर आहे, इतक्या वर्षानंतर ही दोघांचे नाव एकत्र घेतले जाते. उत्कट आणि निस्वार्थ प्रेम म्हणून त्यांचे दाखले दिले जातात. अतूट प्रेम असूनही राधाकृष्णाचा विवाह होऊ शकला नव्हता त्यामुळे प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न येतात ते कृष्ण वृंदावना मध्ये गेल्यानंतर देवी राधाचे काय झाले?


त्यांचे आयुष्य कसे गेले? त्या दोघांचे लग्न का झाले नाही आणि राधाचा मृत्यु नेमका कसा झाला? या प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला या लेखात देणार आहे. पुरातन ग्रंथा नुसार राधा कृष्णाचे बालपण एकत्र गेले त्या दरम्यान दोघांना प्रेमाची अनुभूती झाली आणि त्यांचे अतूट नाते बनले.

काही वर्षानंतर एक वेळ अशी आली की त्यांना एकमेकांपासून दूर व्हावे लागले तो प्रसंग म्हणजे कंसाचा व ध करण्यासाठी श्रीकृष्णाला जेव्हा मथुरेला जावे लागले तेव्हा श्रीकृष्णाने लवकरच परत येण्याचे वचन दिले. देवी राधाने खूप दिवस श्रीकृष्ण परतण्याची वाट पाहिली पण परिस्थितीमुळे त्यांना येता आले नाही.

काही दिवसांनी देवी राधाचा विवाह एका यादवासी झाला, त्यांनी विवाहानंतर आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या परंतु त्यांच्या मनातील श्रीकृष्ण वरचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही. दुसरीकडे भगवान श्रीकृष्णाचा विवाह सुद्धा देवी रुक्मिणी शी झाला ज्या राधा सारख्याच श्रीकृष्णावर प्रेम करायचा.

मथुरेत कंसाचा व ध केल्यानंतर श्रीकृष्णाने अनेक रा क्षसांचा संहार केला या दरम्यान महाभारत यु द्धाचा काळ ही आला होता. त्यावेळी श्रीकृष्ण द्वारकेत येऊन राहिले, जेथे त्यांना द्वारकाधीश नावाने ओळखले जाऊ लागले. श्रीकृष्ण आणि देवी राधाने पूर्ण आयुष्य आपआपले कर्तव्य पार पाडले.

सर्व कर्तव्यातून मुक्त झाल्यानंतर देवी राधाने पुन्हा श्रीकृष्णाला भेटण्याचा निश्चय केला त्यामुळे त्या द्वारका नगरीत गेल्या तिकडे गेल्यावर श्रीकृष्णाचा विवाह बद्दल कळले. द्वारकेत श्रीकृष्ण शिवाय देवी राधाला कोणीही ओळखत नव्हते. श्रीकृष्णाला देवी राधा बघताच खूप आनंद झाला ते दोघेही खूप दिवस संकेता द्वारे बोलत राहिले.

कृष्णाबरोबर जास्त वेळ घालविण्यासाठी त्यांनी महालात राहण्याची परवानगी मागितली. मग देवकीच्या रुपात त्या कृष्ण महालात राहू लागल्या. तेथे राहून त्या महालातील जबाबदाऱ्या सांभाळून लागल्या. त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या श्रीकृष्णाचे मनोभावे दर्शन करायच्या.

महालात श्री कृष्णा जवळ राहूनही देवी राधाला कृष्णाशी अध्यात्मिक भावाची अनुभुती होत नव्हती यामुळे त्यांनी महालापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्यांना पुन्हा एकदा उत्कट भक्तीचे अनुभुती होईल. देवी राधा द्वारकेतच राहू लागल्या थोड्या दिवसांनी देवी राधा अशक्त होऊ लागल्या त्यांचा अंतिम काळ जवळ आला होता.

अशा परिस्थितीत भगवान श्री कृष्ण त्यांच्या जवळ पोहोचले. श्री कृष्णाने देवी राधाची शेवटची इच्छा विचारली, तेव्हा देवी राधाने त्यांना शेवटचे बासरी वाजवायला सांगितले. राधासाठी श्री कृष्णाने बासरी वाजवने सुरू केले आणि मधून धून कानी पडू लागले. कथेनुसार श्रीकृष्णाने अनेक दिवसांपर्यंत सतत बासरी वाजवली आणि देवी राधाने बासरीचे मधूर धून ऐकत ऐकतच आपले शरीर त्यागले.

देवी राधाच्या मृ त्यू नंतर श्रीकृष्ण अत्यंत दुःखी, कष्टी झाले. त्यांना माहीत होते की त्यांची बासरी देवी राधाला खूप प्रिय होती यामुळे राधाचा मृ त्यू नंतर त्यांनी आपली बासरी तोडून झुडपात फेकून दिली आणि परत कधीही बासरी न वाजवण्याचा प्र ण केला.

अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधाच्या प्रेम कहाणीचा शेवट झाला. परंतु श्रीकृष्णाच्या स्वरूप गमनानंतर दोन्ही दिव्यशक्ती पुन्हा एक झाल्या. 

close