shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा शहरात हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला मोहरम मोठया उत्साहात साजरा होणार



प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ७ /  करमाळा शहरात हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला मोहरम मोठया उत्साहात साजरा होणार असल्याचे मोहरम कमिटीचे अध्यक्ष शौकत नालबंद यांनी सांगितले. करमाळा शहरात सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेला मोहरम सण शांततेत मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवण्यात आले करमाळा शहर मोहरम कमिटीची बैठक मा. नगराध्यक्ष व मोहरम कमिटीचे अध्यक्ष शौकत नालबंद यांच्या अध्यक्षतेखाली संप्पन झाली. 

या बेठकीत सवारी स्थापना करण्याचे नियोजन ठरवले आहे सर्व धर्मसमभावाचे हिंदु मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेले किल्ला विभाग येथील नालसाहब या मानाची सवारीसह करमाळा शहरात मोहद्दीन तालीम येथील जाकीर वस्ताद यांची सवारी, इमाम कासम यांची सवारी कुंभार गल्ली, राजु परदेशी यांची अल्लादीन सवारी, खाटीक गल्ली येथील बिलालभाई यांची नालेहैदर भवानीपेठ येथील, मंहमदशरीफ यांची लालनसाहब सवारी, मोहल्ला गल्लीतील हाजी समीर बावा यांची, नालेहैदर सुतारगल्ली येथील, शंकर हवालदार यांची पांच पंजे, रंभापुरा येथील बबन दुधाट यांची, मक्कदुम अल्लाउद्दीन सवारी सुमंतनगर येथील दादा अडसुळ, अल्लाऊद्दीन अर्जुन राऊत यांची पीर सवारी, गंवडी गल्ली येथिल निसार झारेकरी यांची सवारी, मोलालीनगर येथील मदारी बांधवाची सवारी ,फारूक कुरेशी यांची पंजाब वस्ताद चौकमधील सवारी, यांची स्थापना करण्यात आली व  मानाच्या डोले आघाडीचा तैमुर सय्यद यांचा डोला हाजी उस्मान सय्यद किल्ला वेस येथील पांढरी ताजा, सुमंतनगर येथीद नारायण जाधव यांचा डौला, गंवडी गल्लीतील जाकीर राजा यांचा ताजा, बसवण्यात आले.

या बैठकीला सय्यदभाई पत्रकार हाजी उस्मान सय्यद, हाजी अल्ताफशेठ तांबोळी, हाजी कलिम काझीसर, हाजी महमंद अली शेख, सादीक काझीभाऊसाहेब, सुरज शेख अहमदचाचा कुरेशी, जाकिर वस्ताद, हाजी फारूक बेग, फारूक जमादार, मुक्तार पठाण, जाफर घोडके, हाजी समीरबावा शेख, आझाद शेख, मैनुद्दीन शेख इम्तियाज पठाण, राजु परदेशी, बबन दुधाट, सुर्यकांत चिवटे, लब्बु हलवाई, लक्ष्मण भोसले, सारंग परदेशी, झुंबर परदेशी, शंकर हवालदार, बिलाल कुरेशी, हाजी मस्जिद घोडके, जाकिर पठाण, इम्रान वस्ताद, हाजी महमंदअली शेख, फारुक कुरेशी, मंजुर कुरेशी, सचिन माहुले, देविदास घोडके, रफिक शेख, मुद्दसर दारुवाले उपस्थित होते.
close