शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०६ ऑगस्ट २०२२
पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून वयोवृद्ध पती पत्नीला मारहाण..!!
राहुरी : पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून वयोवृद्ध पती पत्नीला लोखंडी पाईप, लाकडी दांडा व विटाने मारहाण करून धमकी देण्यात आली. ही घटना दिनांक २ ऑगस्ट रोजी राहुरी तालूक्यातील कणगर येथे घडलीय.
यशवंत सखाराम जाधव, वय ८१ वर्षे, राहणार कणगर बुद्रुक, ता. राहुरी. यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास यातील आरोपी अरूण जाधव, अक्षय दिवे, देवराम जाधव हे तिघेजण यशवंत जाधव यांच्या घरासमोर आले. आणि यशवंत जाधव व त्यांच्या पत्नीला म्हणाले कि, तू आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार का दिलीस. असे म्हणून त्यांनी शिवीगाळ केली. तसेच लोखंडी पाईप, लाकडी दांडा, वीट आणि लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तू आमच्या नादी लागला तर तूझा काटा काढू, अशी धमकी दिली. घटनेनंतर यशवंत जाधव यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
यशवंत सखाराम जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरूण देवराम जाधव, अक्षय राजू दिवे, देवराम सखाराम जाधव सर्व राहणार कणगर बुद्रुक, ता. राहुरी. या तिघांवर गुन्हा रजि. नं. ७२६/२०२२ भादंवि कलम ३२४, ३४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुनिल निकम हे करीत आहेत.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

