shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्राम्हणी येथे कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रण या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                              मंगळवार  दिनांक ३० ऑगस्ट २०२२

ब्राम्हणी येथे कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रण या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन..!!
कीड नियंत्रणाकरिता एकात्मिक पद्धत महत्वाची-किटक शास्त्रज्ञ नंदकुमार भूते यांचे प्रतिपादन..!!

राहुरी : ब्राम्हणी गावात कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रण या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील,किटक शास्त्रज्ञ नंदकुमार भूते साहेब,राहुरी तालूका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे,वांबोरी मंडल अधिकारी विनया बनसोडे,संदीप केलगेंद्रे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरवातीला तालूका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे साहेबांनी सोयाबीन,कपाशी पिक व्यवस्थापन विषयावर माहिती दिली.दर वर्षी पेक्षा यंदा सोयाबीन,कपाशी पिक क्षेत्र वाढले आहे असेही ठोकळे साहेब यांनी सांगितले.

नंतर कृषी विद्यापीठ येथील किटक शास्त्रज्ञ नंदकुमार भूते साहेबांनी कापूस आणि सोयाबीन पिकावरील एकात्मीक पद्धतीने रोग-किड नियंत्रण कसे करता येईल यावर माहिती दिली.प्रथम साहेब म्हणाले 'तुज आहे तुजपाशी,परी तु जागा चुकलासी'.पिकांवरील रोगराई नियंत्रीत करण्यासाठी सर्व काही निसर्गातच आहे.तसेच जास्तीत-जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा,यामुळे पिकांची रोग-प्रतीकारक शक्ती वाढते आणि ऊत्पादन सूद्धा वाढते. 
एकात्मीक पद्धत म्हणजे सर्वच स्तरातून रोग-किडींचा बंदोबस्त करणे होय.जसे की मशागत,भौतिक,जैविक,नैसर्गिक आणि रासायनिक पद्धत या सर्वच स्तरातून रोग-किडी नियंत्रीत करता येतात.सुरवातीला च पिकांवर कोणतीही रासायनिक फवारनी करू नये.यामुळे मीत्र किडी मरण पावतात. 

मीत्र किडी,पक्षी,मध-माशी यांचे संवर्धन करावे.यांच्या माध्यमांतूनच नैसर्गिकरीत्या रोग-किडींचे नियंत्रण आपोआप होत असते.तरीही पिकावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त असेल तरच रासायनिक औषधांची फवारनी करावी.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा -अधिक माहितीसाठी येथे भेट द्या 👇🏼

साहेब म्हणाले,किडींची संख्या फक्त नियंत्रीत करा,मारण्याची गरजच नाही.एखादा जोर्याचा पाऊस जरी झाला तरी अनेक रोगराई नष्ट होते.या रासायनिक औषधांमुळे पंजाब,हरियाणा सारख्या राज्यात अनेक केंसरच्या पेशंटची संख्या वाढली आहे.

अन्न-धान्याच्या माध्यमातून आपल्या आहारात रासायनिक औषधांचे सेवन होते आणि आपण रोगराईस बळी पडतो.म्हणून रासायनिक औषधे फवारनी शक्यतो टाळावी.

पिकावर किड येऊ नये म्हणून गोमुत्र,निंबोळी अर्क फवारनी करावी.शेतात पक्षी थांबे करावे,प्रकाश सापळा,कामगंध सापळा या पद्धतीने किडींचे नियंत्रण केले तर पिकावर रोगराई येणारच नाही,असे भूते साहेब म्हणाले.

ऑगस्ट महिन्यापासून कपाशी पिकात गुलाबी बोंड अळी येण्याची शक्यता असते,म्हणून ऑगस्ट महिन्यापासून पासून कपाशीचा शेवट होईपर्यंत शेतात कामगंध सापळे लावावे.पंतगाने अंडी दिल्या नंतर आणि ती अळी अंड्यातून बाहेर पडल्यानंतर कपाशीच्या फूले,पाते किंवा बोंडात शिरते मग अळी नियंत्रण करने कठीण होते म्हणून अळी येऊ नये म्हणून कामगंध सापळे लावने गरजेचे ठरते,असे साहेब म्हणाले. 

       नंतर मंडळ अधिकार बनसोडे मॅडम यांनी कामगंध सापळे,प्रकाश सापळे,पक्षी थांबे शेतात कसे लावावे याबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाच्या शेवटी ब्राम्हणी अॅग्रो माइंड फार्मर प्रोड्युसर कंपनीने अधिकार्यांच्या हस्ते कंपनी सभासदांना कपाशी पिकासाठी कामगंध सापळे मोफत वितरित केले.

       या कार्यक्रमात ब्राम्हणी मधील कृषी सेवा केंद्र चालक आकाश जाधव,सोमनाथ खोसे,नितीन शिरसाठ यांच्यासह प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव मोकाटे (नाना),धनंजय राजदेव,रामचंद्र तारडे,अविनाश बानकर,जनार्धन चिंचाने,मच्छींद्र वने,क्रीष्णा धामने,अनीलराव शिरसाठ,राहुलराजे हापसे,दत्तात्रय म्हसे असे अनेक प्रगतशील शेतकरी ऊपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन ब्राम्हणी अॅग्रो माइंड फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि ब्राह्मणी मधील कृषी सेवा केंद्र चालकांचा मोठा सहभाग होता.शेवटी आभार प्रदर्शन,दर्शन कृषी सेवा केंद्राचे संस्थापक सोमनाथ खोसे यांनी केले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा -अधिक माहितीसाठी येथे भेट द्या 👇🏼


Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close