चिकाटी,जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मेहुल तोष्णीवालची भरारी ..! नीट परीक्षेत तब्बल 628 गुण. मेहकर । अनिल मंजूळकर:-
माहेश्वरी समाजाचे जिल्हा कोषाध्य्क्ष गोपाल तोष्णीवाल आणि माजी नगरसेविका शैला तोष्णीवाल यांचा मुलगा मेहुल याने स्वतःची जिद्द व परिश्रमाच्या बळावर नीट परीक्षेत 628 गुण मिळवून उत्तुंग भरारी घेऊन यश संपादन केले,.
सतत दोन वर्षे कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे आपल्या स्वतःच्या घरीच ऑनलाईन क्लासेस करून आथक परिश्रमाने सतत 14 तास अभ्यास करून यश संपादन केले आहे त्याचे आजोबा जगनाथ तोष्णीवाल यांची आपल्या घरामध्ये एखादा डॉक्टर व्हावा अशी इच्छा असल्याने त्यांनी नातू मेहुल ला नेहमीच मार्गदर्शन केले होते मेहुल यशाचे श्रेय आजी-आजोबांना, मामा आशिष ,गोपाल लड्डा तसेच श्वेता सिंगी आणि केला मॅडम, आणि डॉ.आर.एन.लाहोटी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक तसेच अध्यक्ष याना देतो ,त्याचा सत्कार डॉ. राजेश मुंदडा, डॉ.सोनाली मुंदडा, व माहेश्वरी समाजाकडून चिखली अर्बन बँकेने त्यांचे स्वागत केले आहे.

