shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आडसूळ टेक्निकल कॅम्पसच्या माध्यमातुन युवकांना मिळाली नोकरीची संधी


 इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सच्या १६ अभियंत्यांची एअरटेल या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड 

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर :१० /  चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील यांनी पदभार स्वीकारल्या पासून विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोबतच महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवत करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देत आहेत. 

अंतिम वर्षाच्या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी एअरटेल या बहुराष्ट्रीय कंपनीचा इंटरव्यू ६ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एअरटेल कंपनीचे एरिया मॅनेजर देशमुख सर व त्यांचे सहकारी क्षिरसागर सर, सुनील यादव व दीपक सर यांनी इंटरव्ह्यू घेतले. यासाठी ॲप्टीटूड टेस्टसाठी ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी २० विद्यार्थी एच आर आणि पर्सनल इंटरव्यूसाठी पात्र झाले. यामधून १६ विद्यार्थ्यांची एअरटेल या कंपनीने निवड केली. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रवीण शेळके, दीपक त्रिभुवन, सौरभ कोतकर, विकास कोल्हे, सुमित पावसे, विनोद जाधव, वैभव राऊत, निखिल पानसंबाळ, शंकर पावसे, प्रतीक तरटे, सुशील तोरणे, रोहित ताकपेरे, जयदीप पांडुळे, राहुल गायकवाड, देविदास शिरसाट व वैभव बुचुडे यांची निवड झाली आहे.या सर्वांना एक वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यान विद्यार्थ्याला २.७५ लाखाचे  स्टायपेंड, फ्री इंटरनेट फॅसिलिटी व विविध सवलती मिळणार आहेत. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्यांना ३.६० लाखाचे पॅकेज मिळणार आहे. 

२०११ मध्ये स्थापित आडसूळ शैक्षणिक संकुल याची नेहमीच दर्जेदार शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट व अन्य दर्जाची नोकरी  तरुणांना मिळावी या विषयावर भर राहिली आहे.  निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ, उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ माणिक आडसूळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप एम पाटील, उप प्राचार्य श्री.किशोर जाधव, आडसूळ तंत्रनिकेतनचे प्राचार्य गडाख आर एस, संगणक विभाग प्रमुख डॉ.साजिद उल्लाह खान, एम.बी.ए विभाग प्रमुख डॉ.सुहास पाखरे, इलेक्ट्रॉनिक विभाग प्रमुख डॉ.दिनेश अडोकर, डॉ. विश्वजित कांबळे, डॉ. धन्यकुमार जैन, डॉ.हेमंत जाधव, प्रा. रमेश काकडे, प्रा.आशिष मोरे, प्रा. कुंदा तरवडे, प्रा.गायकवाड एस ए, प्रा.वाकळे आर यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

(साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री . विश्वनाथजी आडसूळ, प्राचार्य डॉ.प्रदीप एम. पाटील, उपप्राचार्य प्रा. किशोर जाधव, एअरटेल कंपनीचे एरिया मॅनेजर देशमुख, क्षीरसागर, सुनील यादव, दीपक, व निवड झालेले विद्यार्थी )
close