shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नियमित बस सेवेसाठी युवक काँग्रेसचे चक्का जाम आंदोलन..!



लोणार ( विजय गोलेछा).                       
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बस नसल्यामुळे वारंवार वाहतूक नियंत्रक बुलढाणा यांना निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

ग्रामीण भागातील सेवा त्वरित सुरू करण्यासाठी शाळेतील मुले व मुलींना घेऊन लोणार येथे बस समोर आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेस मेहकर -लोणार विधानसभा अध्यक्ष भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. शाळेतील मुलांकरता तीन दिवसामध्ये नियमित बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन डेपो मॅनेजर कोळपे यांनी यावेळी दिले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संदीप मापारी, भाजपा तालुका अध्यक्ष भगवानराव सानप, राहुल  राठोड, गोविंद राठोड, समाधान चव्हाण, अविनाश चव्हाण, जनार्धन,राहुल चव्हाण, सुरेश राठोड,  सुरेश  राठोड, राजू चव्हाण, सोनाजी टेकाळे, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक वर्ग उपस्थित होते.
close