पुणे:- "सेझ अंतर्गत अस्तित्वात आलेल्या खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ/-चिडलेल्या शेतकऱ्यांपुढे सभा गुंडाळावीलागली-सभेतील शेअर्स विक्री संदर्भातील ऐनवेच्या ठरावाला चिडलेल्या शेतकऱ्यांनी केलाप्रचंड तीव्र विरोध ! ठराव पारित होऊ दिला नाही!"
खेड डेव्हलपर्स लिमिटेड ही सेझ बाधित शेतकऱ्यांची कंपनी गेली १४ वर्षे वादांतीत आहे. ही कंपनीशेतकऱ्यांच्याफसवणुकीतून अस्तित्वात आली असून या कंपनी शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधात आहे. बाधित शेतकऱ्यांना ही कंपनी नको या कंपनीची जमीन शासकीय पातळीवर एम.आय.डी.सी. मार्फत व्यवहार करून योग्य मोबदला हवा आहे.
कल्याणी यांच्या के.ई. आय.पी.एल. कंपनीच्या काही हित संबंधित लोकांकडून शेअर्स विक्री करून खाजगी पातळीवर व्यवहार करण्याची जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे सर्वस्वी नुकसान होणार असून अत्यल्प मोबदला त्यांच्या पदरात पडणार आहे.
परताव्या संबंधीत क्षेत्र सर्व सेझ बाधित शेतकऱ्यांना एकत्रित दिले असल्याने ते व्यक्तिगत रित्या हस्तांतर करण्यात कायदेशीर व तांत्रिक अडचणी आहेत.त्यामुळे शासन व्यवहार करण्यास तयार असताना खाजगी पातळीवर व्यवहार करण्याची धडपड का असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे? म्हणून शेतकरी या गोष्टीस तीव्र विरोध करत आहे.
खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची जमीन हस्तांतरित झाल्यामुळेउद्योगमंत्री, मा. उदयजी सामंत यांनी याबाबत एम.आयडी.सी. मार्फत व्यवहार करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय आमदार मेघनाताई साकोरे/ बोर्डीकर यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा झाली असून यांच्यामार्फत देवेंद्रजी फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, यांना पत्र व्यवहार झाला असून संयुक्त मीटिंग बाबत लवकरच कार्यवाही होणार आहे.
खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा वाकडेवाडी, पुणे येथील राजयोग, हॉल येथे शुक्रवार दिनांक२३/९/२०२२ संपन्न झाली.
या सभेला सुरुवात झाल्यानंतर अहवालातील पत्रिकेवरीलविषयाला सुरुवात झाल्यानंतर हिशेबाला मान्यता देण्यावरून शेतकरी सभासदांनी मोठ्या प्रमाणात आपले हरकती घेण्यास सुरुवात केली. परंतु प्रशासन त्याला दाध देत नसल्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केल्यामुळे सभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
कंपनीवरील दावडी गावातीलशेतकऱ्यांचे प्रतिनिधी चंद्रकांत भालेकर यांच्या संचालक मंडळावरील निवडीला सभासदांनी तीव्र विरोध केला. व या ठरवा बाबत हरकत नोंदवल्या. प्रचंड विरोध केला.
राजू शेट्टी स्टेजवर बसून ऐन वेळेच्या विषयांमध्ये स्वतः भाषण बाजी करून मांडलेला शेअर्स विक्री संदर्भातील ठराव याला शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेऊन प्रचंड विरोध केला त्यावेळेस प्रचंड राढाबाजी झाली. पोलीस प्रशासनाला मध्ये पडून हा गोंधळ थांबवा लागला. राजू शेट्टी यांना भाषण आटपते घेऊन सभा गुंडाळून काढता पाय घ्यावा लागला.
शेतकऱ्याचा शेअर्स विक्रीला विरोध असून खाजगी पातळीवर परताव्या संदर्भात कुठलाही निर्णय न लादता शासनाने एम.आय.डी.सी. मार्फतच निर्णय घ्यावा. शासन/उद्योग मंत्री खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची जमीन विक्री करून योग्य मोबदला द्यायला तयार आहे. त्यानुसार शासनाकडूनच परताव्याबाबत निर्णय होऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा अशी बहुसंख्य लोकांची/सभासदांची अपेक्षा आहे .
खासदार राजू शेट्टी सभा सोडून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन यापुढे संघटित होऊन शासकीय पातळीवरूनच पंधरा टक्के परताव्यासंदर्भात निर्णय घेण्याचा निर्धार केला.
सर्वसाधारण सभेतशेतकऱ्यांच्या हितासाठी जागृत असणाऱ्या शेतकरी प्रतिनिधींमध्ये बाळासाहेब साकोरे, अॅडसुनील लिमगुडे, विलास नाना थिटे, अभिजीत साकोरे,मोहन दौंडकर, सुदामराव माशेरे,काशिनाथ हजारे, विश्वास कदम, भानुदास नेटके, सुदामराव शिंदे, प्रकाश दौंडकर, संतोष दौंडकर, एकनाथ गोरडे, उत्तमराव कान्हुरकर, ऋषिकेश चव्हाण, आतिश कान्हुरकर, ओंकार कान्हुरकर, निलेश म्हसाडे, दत्तात्रेय नेटके, प्रा. बाळासाहेब माशेरेयांनी मोलाची भूमिका निभावली.

