राहुरी । प्रतिनिधी :-
डॉ. तनपुरे कारखान्याच्या सहा कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या गट नंबर 877 मधील परस्पर विक्री झालेल्या 56 गुंठे जमिनीची चौकशी करावी व जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून परस्पर विक्री केलेली जमीन परत मिळवावी.
त्याचप्रमाणे राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर गट नंबर 542 मध्ये केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास जागा खरेदी योजना राबवून केंद्र शासनाकडून प्रति गुंठा मिळणारे अनुदान कारखान्याला घ्यावे व सदरची जमीन प्रसादनगर वासीयांच्या नावावर करून देण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून कारखान्याला त्यांचा मोबदला मिळेल व प्रसादनगर वाशीयांची जागा त्यांच्या मालकीची होईल व कामगार व सभासदांची देनीही कारखान्याला देता येईल.
आप्पासाहेब ढूस, सभासद, डॉ तनपुरे सहकारी साखर कारखाना. तथा..अध्यक्ष- प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ.
(वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30 सप्टेंबर 2022)

