अशीच उत्तरोत्तर प्रगती करा - नंदकुमार कंगळे
प्रतिनिधी : आसावरी वायकर
सोलापूर : ३० / समाजसेवक व अहिंसा साधक डॉ. राजेश रतनचंद फडे यांची अहिंसा गो सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू युवारत्न विनायक अशोक लुणिया यांनी डॉ. राजेश फडे यांना भगवा दुपट्टा घालत अहिंसा गो सेना परिवाराची जबाबदारी सोपवली .
डॉ . राजेश फडे यांनी अनेक यश संपादन करण्याची तसेच त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त करत सोलापूरचे मा . नंदकुमार कंगळे यांनी डॉ . फडे यांना शुभेच्छा देत त्यांचे निवडी बद्दल अभिनंदन केले .

