*बांडेवाडी शाळेतील मुलांनी लुटला निसर्ग सफरीचा आनंद.*
चिंकारा अभयारण्य व ऑक्सिजन पार्क कडबनवाडी भेट.
इंदापूर प्रतिनिधी:दि २२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथील मुले व शिक्षक यांनी एक दिवसीय परिसर भेट , वनभोजन , निसर्ग सहलीचे आयोजन केले. यामध्ये सुरूवात *धाकटे पंढरपूर विठ्ठलवाडी* येथून झाली. येथील सुंदर , प्रसन्न मंदिर , परिसर पाहून मुले आनंदून गेली. *श्री क्षेत्र बाबीर देवस्थान रूई* येथे दर्शन घेऊन *चिंकारा अभयारण्य व ऑक्सिजन पार्क कडबनवाडी येथे भरपूर मौज , मजा , मस्ती मुलांनी केले. त्यात चिंकारा दर्शन झाल्यावर मुलांचा आंनद गगनात मावेनासा झाला. काय डोंगर काय झाडी या गाण्यावर मुलांनी भन्नाट डान्स केला.* पर्यटकांना बसण्यासाठी केलेल्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतला. परिसरातील झाडे , झुडपे , प्राणी , पक्षी माहिती वाचली. तलाव तुडुंब भरले असल्याने वातावरण खूप छान आहे.सर्वानी सहकुटुंब , मित्र यांचे सोबत हमखास एकदातरी भेट द्यावीच. सहलीचे नियोजन शिक्षक संतोष हेगडे व ललिता वाघमोडे यांनी केले. मुले व पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

