shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लातूर आणि जवळपासच्या ग्रामीन कलाकारांसाठी सुवर्ण संधी..आगामी चित्रपटासाठी भव्य ऑडिशन.


सिनेक्षेत्र हे आपल्या राज्याच्या विकासासाठी आणि खास करून मराठी सिनेमे हे आपल्या राज्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कायम अग्रेसर राहिला आहे..

एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्र झपाट्याने प्रगती कडे वाटचाल करत असतांनाच सिनेक्षेत्र किंवा नाट्य क्षेत्राला ही कले सोबतच व्यवसाय ह्या दृष्टीकोनातून पाहिलं जाऊ लागलं आहे..
अनेकांना आपल्या कलेच्या जोरावर फेसबुक, youtube च्या माध्यमातून प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही ही मिळत आहेत,
महाराष्ट्र हे कलाकाराचं राज्य आहे.
खास करून ग्रामीण भागात असंख्य कलाकार आहेत पण योग्य व्यासपीठ किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे ह्या कलाकारांना मुंबई-पुण्या पर्यंत पोहचता येत नाही.

आणि सिनेमा क्षेत्रात काही लोकांना आलेले वाईट अनुभव या मुळे कदाचित ग्रामीण भागातील कलाकार स्वतः मध्ये सामर्थ्य असून सुद्धा प्रकाश झोतात येण्यापासून वंचित राहतो..
हीच बाब लक्षात घेऊन ग्रामीण कलाकारांच्या कलेला वाव देण्यासाठी आगामी मराठी आणि तेलगू अश्या चित्रपटाच्या कलाकार निवडीसाठी लातूर शहरात ऑडिशन घेण्यास चित्रपट निर्माते महादेव ढवळे आणि दिग्दर्शक रमेश पवार आणि टीम ने पुढाकार घेतला आहे.
निर्माते आणि दिग्दर्शक दोघांचीही ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असल्यामुळे ग्रामीण कलाकारांच्या व्यथेची जाणीव असल्याचं मत रमेश पवार यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केलं.
या ठिकाणी तेलंगाणा राज्यातील काही निर्माते ही येण अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.
रमेश पवार हे कला-समृद्धी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मुंबई चे संस्थापक अध्यक्ष आहेत तर चित्रपटाचे निर्माते हे व्यावसायिक आहेत.
हे ऑडिशन सर्व कलाकारांशी पूर्णपणे निःशुल्क असून
 लातूर आणि ग्रामीण भागातील कलाकारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश पवार यांनी केलं आहे.
ऑडिशन चे ठिकाण दयानंद कॉलेज सभागृह बार्शी रोड लातूर
वेळ सकाळी 10 वाजता पासून असेल. 
रमेश पवार (दिग्दर्शक)
अधिक माहितीसाठी आपण 8767526119,  9845595910  ( सहायक दिग्दर्शक ) 
किंवा लातूरचे कलाकार  8799840313 उमेश कांबळे ह्यांच्याशी संपर्क साधू शकता..
close