shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संग्राम गायधने उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणार ; युवा नेते सिद्धार्थ मुरकुटेंसह अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :  तालुक्यातील अशोकनगर, निपाणी वडगाव येथील प्रगतशील शेतकरी जगन्नाथ गंगाधर गायधने यांचे पुतणे व भाऊसाहेब गायधने (उर्फ बी जी गायधने सर) यांचे चिरंजीव संग्राम गायधने हे एम.एस या पदव्युत्तर उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला जात आहेत,संग्राम गायधने यांनी बी.टेक केले असुन एम.एस या पदव्युत्तर शिक्षणासाठी ते इंग्लंडला जात आहेत. 

      यानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे,अशोक कारखान्याच्या तज्ञ संचालिका सौ. मंजुश्रीताई सिद्धार्थ मुरकुटे, अशोक  कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उंडे,माजी चेअरमन व विद्यमान संचालक सोपानराव राऊत, माजी चेअरमन भाऊसाहेब कहांडळ, कामागार पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दौंड,रयत सेवक सोपाराव नाईक,काशिनाथ गोराणे बाबा,संजय पाटील गायधने, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र काळे,माजी सरपंच मुरलीधर राऊत,तसेच निपाणी वडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close