shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोयनाड - नागोठणे मार्गावरील श्रीगाव नजीकच्या रस्त्यावर भीषण अपघात..

रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख राजाभाई केणी यांची तत्काळ घटनास्थळी धाव तसेच अपघातग्रस्तांना स्वतःच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी केले अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल..


रसजेश बाष्टे अलिबाग वार्ताहर, :-
पोयनाड नागोठणे मार्गावरील श्रीगाव रस्त्यावर आज दुपारी २ वाजताच्या सुमारास मोठा भीषण अपघात झाला.अपघाताची माहिती कळताच रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख राजाभाई केणी यांनी घटनास्थळी धाव घेतली व स्वतः च्या रुग्णवाहीकेत अपघातग्रस्तांना उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले. भरधाव वेगाने येणाऱ्या इको आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार ठक्कर झाली व हा भीषण अपघात झाला असल्याची माहिती सदरील घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिली. ही ठक्कर इतकी जोरदार होती की, इकोच्या समोरील पूर्ण भाग दबला गेला तर मोटारसायकलचा चक्काचूर झाला आहे असून रस्त्यावर रक्ताचा सडाच्या सडा पसरला होता. 

थळ येथील मोटारसायकलस्वाराला व  दोन मुलांना भरपूर मार लागला असून त्यातील एकाची परिस्थिती चिंताजनक आहे. पोयनाड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळीचा पंचनामा केला व पुढील तपास करीत आहेत. आजकाल तरुण मंडळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भरधाव वेगाने वाहने चालवीत असतात व वाहनावरील ताबा सुटून अशा प्रकारचे अपघात घडून स्वतःचा जीव धोक्यात आणत आहेत याची खंत यावेळी राजाभाई केणी यांनी यावेळी व्यक्त केली.
close