पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी- शिवसेना इंदापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरज काळे यांची जिल्हा आरोग्य अधिकारी यांना केली निवेदन पत्रातून मागणी.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे मानवी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी निवासी पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी म्हणून शिवसेना इंदापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरज काळे यांनी पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवानराव पवार यांच्या नावे दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी निवेदन पत्र देऊन मागणी केली आहे.
सुरज काळे यांनी दिलेल्या निवेदन पत्रामध्ये नमूद केले आहे की, पळसदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी पुरुष वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी. सदर आरोग्य केंद्रात तीन महिला डॉक्टर आहेत सदर डॉक्टर रुग्णसेवा देत असताना टंगळमंगळ करताना दिसत आहेत व त्या बाबत जाब विचारला असता रुग्णांना उलट सुलट उत्तरे देतात व रात्री अपरात्री हे डॉक्टर मुक्कामी नसल्यामुळे महिला डॉक्टरांना फोन करण्यास अडचण येते. त्यामुळे एक पुरुष निवासी डॉक्टर असेल तर त्यांना आमचे म्हणणे मांडता येईल असे रुग्णांचे व ग्रामस्थांची मागणी आहे. तरी पुरुष निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती व्हावी अशा आशयाचे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवानराव पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सरतापे यांना देण्यात आले.

