shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर महाविद्यालयाच्या वतीने सबिल सय्यद यांचा सन्मान ; राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सय्यद यांची उल्लेखनीय कामगिरी

प्रतिनिधी : निरज चांगटे

अहमदनगर : २८ /   युथ आयकॉन फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमा प्रमाणेच कराटे प्रशिक्षण हा उपक्रम गेली अनेक दिवस राबविला जात आहे .समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. समीर मोहपात्रा , प्राध्यापक रवींद्र मते , प्राध्यापिका श्रद्धा कांबळे यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर.जे. बार्नबस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सबिल सय्यद यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

युथ आयकॉन फाउंडेशनचे फाऊंडर आणि सईओ सबिल सय्यद यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून देशाचे व राज्याचे नाव उंचावले आहे . तसेच अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर रित्या सहभाग नोंदविला आहे .
 
अगदी वयाच्या तीन वर्षापासून सय्यद यांनी कराटे खेळण्यास सुरुवात केली .अहमदनगर महाविद्यालयाकडून तसेच इतर संस्थांकडून विविध पुरस्कार ही मिळालेले आहे .कराटे खेळालाच आपले जीवन माननारे सबिल सय्यद प्रत्येक विद्यार्थ्याने कराटे प्रशिक्षण घेण्यासाठी मनापासुन झटत आहेत .कराटे खेळाला ओळख देण्यासाठी महाविद्यालयाने त्यांना वेळोवेळी सहकार्य केलेले आहे .

सबिल सय्यद यांनी सत्कारा वेळी आई-वडिलांचे तसेच नेहमी सहकार्य करणाऱ्या मित्र परिवाराचे देखील मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केले.
close