भोजडे येथे आदर्श सभासद पुरस्कार वितरण सोहळा
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
कोपरगाव तालुक्यातील मौजे भोजडे येथील भोजडे नं २ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, भोजडे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आज सरला बेटाशी निगडित गवंडगाव येथील आश्रमाचे महंत गोपालगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोरील प्रांगणात मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री मा.बबन नाना घोलप आणि प्रमुख उपस्थितीत सहाय्यक निंबंधक मा. नामदेव ठोंबळ साहेब तर तालुका विकास अधिकारी मा. अविनाश काटे साहेब उपस्थित होते. यावेळी संस्थेचा आलेख व कामकाज बघून संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांचं सहकार क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार माजी मंत्री बबन नाना घोलप यांनी व्यक्त केले.
सोसायटीच्या माध्यमातून कै.सिताराम व्यंकटराव पा. सिनगर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रत्येक वर्षी एक आदर्श सभासद म्हणून पुरस्कार देण्यात येत असतो. हे पुरस्काराचे दहावे वर्ष असून यावर्षीचा आदर्श सभासद पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री. शंकर भवानी सिनगर यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचेक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम 𝟏𝟏𝟏𝟏 मात्र देण्यात आले. तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व ग्रामपंचायतींचे मा.सरपंच आणि सोसायट्यांचे मा.चेअरमन यांचाही यावेळी आगळा वेगळा सहकार सन्मान करण्यात आला असून प्रत्येकास "मराठी आठव दिवस" ही पुस्तिका भेट देण्यात आली. असा कार्यक्रम कोपरगाव तालुक्यात पहिल्यांदाच पार पडला.
यावेळी महंत गोपालगिरीजी महाराज यांनी संस्थेच्या संचालक मंडळास भरभरून आशीर्वाद देत आपल्या हातून समाजसेवेच्या माध्यमातून खरी ईश्वरसेवा घडत असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात चेअरमन मुकुंद सिनगर यांनी अधिक सांगितले की, हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागे निवडणूक किंवा राजकारण हा कुठलाही हेतू नसून आपण आज ज्या मातीत जन्माला आलो आणि ज्या पंचक्रोशीने आपल्याला उत्तम संस्कार दिले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रथम स्पष्ट केले. सरपंच आणि चेअरमन यांना जिल्हानिहाय संघटित करून यापुढे जशी सरपंच परिषद असते तशीच चेअरमन परिषद घेण्याचा आमचा मानस असून येत्या दोन वर्षात संपूर्ण जिल्ह्यातील सरपंच आणि चेअरमन यांची शिर्डीत तीन दिवशीय कार्यशाळा घेणार असल्याची घोषणा केली. यात कुठलाही राजकीय हेतू नसून गावागावात फक्त विकासाचे राजकारण व्हावे, हा एकमेव शुद्ध हेतू असल्याचे शेवटी स्पष्ट केले.
यावेळी शिवाजी ठाकरे, आबासाहेब भोकरे, अशोक काजळे, शहाराम सिनगर, अशोक कानडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्यपद्धतीचे मनापासून कौतुक केले.
यावेळी प्रमुख अतिथीमध्ये मा. डॉ. गुलाबराव पा. वरकड, डाऊच गावचे लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ, साईराम पा.कोळसे, वाल्मिक दादा भोकरे, अभिषेक रमेश शिंदे, नानासाहेब पा. सिनगर, संभाजी पा. सिनगर, साहेबराव पा. सिनगर, भाऊसाहेब पा. सिनगर, यांच्यासह पूर्व भागातील सर्व गावचे सरपंच व विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन उपस्थित होते.
सूत्रसंचालन राम गायकवाड सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शंकर सिनगर यांनी मानले. यावेळी सोसायटीचे व्हा. चेअरमन दिनकर बाबासाहेब सिनगर तर संचालक रावसाहेब सिनगर , ज्ञानेश्वर सिनगर ,फकीरचंद जेऊघाले, दीपक धट, अशोक रखमाजी मंचरे, कुंडलिक रामचंद्र घुले, विजय दामोदर सिनगर, बळीराम व्यंकट सिनगर, राजेंद्र घणघाव, भीमजी शिंदे, सचिव श्री. जालिंदर टेके, मदतनीस श्री. मधुकर सिनगर यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी, सभासद व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

