शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२.
अमन सोशल असोसिएशनचे १३ शिक्षकांना राहुरी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..!!
राहुरी : सोशल असोसिएशन राहुरी मार्फत दिले जाणारे राहुरी तालूका आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ साठी राहुरी तालुक्यातील १३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ बुुुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी होणार असल्याची माहिती अमन असोसिएशनचे अध्यक्ष इब्राहिम (भैय्या) शेख यांनी दिली.
प्राथमिक, माध्यमिक, कला, क्रिडा, प्राध्यापक असे विविध शिक्षक आपापल्या विषयात विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी शाळेत परिश्रम घेऊन शिक्षण देत असतात. अशा गुणवंत ,उपक्रमशील शिक्षकांची राहुरी तालुक्यातून आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक हे पुढील प्रमाणे-
प्राथमिक शिक्षक अनिल नामदेव कल्हापुरे, (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंप्री अवघड),
श्रीमती भारती एकनाथ शेळके(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताहाराबाद),
विजय केशव कांडेकर(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेडगाव),
सौ हबीबा जमीर अहमद शेख (जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा देवळाली प्रवरा).
राहुरी नगरपालीका केंद्र शाळा-
सागर कैलास घालमे (काळे आखाडा),
सौ दिपाली जितेंद्र पतंगे (सरोदे वस्ती),
मनोजकुमार बाबासाहेब पालवे (शाळा नं १ राहुरी).
माध्यमिक शिक्षक सौ शोभा संजय शेळके(श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल शिवाजी नगर),
युवराज रामचंद्र भोसले(कै लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर राहुरी),
बाळासाहेब महिपती पिले (विठ्ठल माध्यमिक विद्यालय आरडगांव).
माध्यमिक कला शिक्षक संदेश बंकटराव विसपुते (सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, कृषी विद्यपिठ).
माध्यमिक क्रिडा शिक्षक शमशुद्दीन जैनुदीन इनामदार (सावित्रीबाई फुले कृषी विद्यापीठ).
प्राथमिक शिक्षक प्राध्यापक शिक्षक
प्रा . संजय निवृती भडके(कै लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय राहुरी),
सदरील पुरस्कार वितरण सोहळा राहुरी येथील सहकारमहर्षी डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृह,ए .डी .सी. सी.बँक टाऊन मार्केट यार्ड शेजारी राहुरी येथे सकाळी १० वाजता संपन्न करण्यात येणार आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

