shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री.क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठाण येथे पौर्णिमा निमित्ताने हभप चिकणे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले संपन्न..!

श्रीरामपूर ।  प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथील श्री अडबंगनाथ नाथांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अर्थात ज्या शिळेवर उभे राहून‌ नाथांंनी १२ वर्ष तपश्चर्या केली आहे. अशा पावन तपोभूमीत गुरूवर्य नारायण गिरी यांच्या आज्ञेप्रमाणे हभप स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी येथे श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान निर्माण करून श्री अडबंगनाथांच्या पवित्र शिळेवर विशाल मंदिर उभारले आहे. 

या ठिकाणी सदैव भाविकांची मांदियाळी असते. तसेच दिवसरात्र स्वामी अरुणनाथगिरी महाराज सर्व‌ भाविकांची सेवा करताना आढळतात. या ठिकाणी सदैव प्रसन्न असे वातावरण असते.अशा पवित्र वातावरणात अनेक विद्यार्थी महाराजांकडून वारकरी संप्रदायाचे धडे घेत आहेत. अशा पवित्र ठिकाणाचे जीवनात एकदा तरी लाभ घ्यावा असे हे सुंदर ठिकाण आहे.
 
आज या ठिकाणी स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने पौर्णिमेनिमित्त ह भ प कृष्णा महाराज चिकणे यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले, व तद्नंतर श्री.गणेश भागवत साळुंके. चितळी.श्री.राजेंद्र लक्ष्मण उगले. महाडुक सेंटर. श्री.अण्णासाहेब भाऊसाहेब काळे.पाथरे. यांच्या वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते.
close