shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रुईछत्तीसी गावात हिंदू -मुस्लिम ऐक्याचे दर्शन


 तालुका जिल्हा डिजे मुक्त होणं काळाची गरज

 प्रतिनिधी : सचिन गांधी

टाळ वाजे, मृदंग वाजे... 
वाजे हरीची वीणा ||
|| गणपती निघाले आपल्या गावा... 
मुखाने गणपती बाप्पा मोरया म्हणा ||
अशा हिंदू संस्कृती प्रमाणे पारंपरिक वाद्ये वाजत गाजत रामेश्वर प्रतिष्ठा गणपती नऊव्या दिवशी गणपती बाप्पा विसर्जन करण्यात आले . नगर सोलापूर हायवे वरील बाजारपेठ असलेले मोठं  रुईछत्तीसी गाव आहे.आता गणपती जल्लोष महाराष्ट्रासह देशातील विविध ठिकाणी साजरा होतो आहे.

आपण गणपती उत्सवात जातीय तणावग्रस्त वातावरण पाहिले असेल ऐकले असेल पण नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावात एक वेगळा अनुभव आला . या ठिकाणी रामेश्वर प्रतिष्ठान सामाजिक मंडळ आहे. या गणपतीची सेवा करण्याचं काम एक मुस्लिम समाजातील अत्तार कुटुंब करत आहे. हे सगळं गुण्यागोविंदाने चालू आहे या ठिकाणी गावातील सर्व तरुण मंडळांनी डिजे मुक्त करण्यासाठी पाऊले चालती आहेत.डिजेचा खर्च टाळून तो अनाथ आश्रम मधील मुलांना तो खर्च करत आहोत रामेश्वर प्रतिष्ठान मार्फत सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

 मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ गोरे, उपअध्यक्ष शाहरुख अत्तार, खजिनदार प्रमोद खाकाळ, शेखर गोरे,बाबा शेख, मोहसीन अत्तार, जालिंदर खाकाळ, अस्लम शेख, सांगर गोरे,संदिप गोरे, भैय्या लोखंडे,साई दहिवाळकर,साई भामरे,गुलाब काळे ,संतोष भामरे, या सर्वच कार्यक्रम साठी विशेष सहकार्य माजी उपसभापती रविंद्र भापकर, डॉ . निलेश भामरे,नाथामहाराज गोरे, समस्त रुईछत्तीसी भ़जनी मंडळाचे  यांचे लाभले, टाळ मृदंगाच्या चा आवाजाने गावकरी मंत्रमुग्ध झाले अशा भक्तिमय वातावरणात सा संपूर्ण सोहळा संपन्न झाला
close