झगडेवाडी गाव हे सर्व जनावरांना
१००% लंपी लस देणारे पहिले गाव
इंदापूर प्रतिनिधी:राज्यात लंपि रोगाने ग्रस्त असलेल्या अनेक जनावरे यांच्यावर उपचार सुरू असताना त्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या रोगावरील प्रतिबंधक लस आज झगडेवाडी गावात सर्व जनावरांना देऊन १००%लसीकरण करण्यात आल्याची माहिती झगडेवाडी सरपंच यांचे प्रतिनिधी तथा इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी गावामध्ये सर्व जनावरांना लंपी लस १०० टक्के दिली.ही लस वडापुरी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यावतीने देण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे हेही उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना लंपी लस सर्व जनावरांना घेण्यासंदर्भात आव्हान केले होते यास विशेष सहकार्य पशुवैद्यकीय अधिकारी वडापुरी यांचे लाभले.

