संजय महाजन, शिर्डी
लोणी काळभोर :- तीर्थक्षेत्र रामदरा कोळपे वस्ती येथील ऑक्सिजन पॉईट क्र ३ येथील परिसरात दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी लोणी काळभोर कदम वाक वस्ती येथील सुप्रसिद्ध डॉक्टर जो चांगले काम करतात सर्वांचे मदतीला येतात,अंध,अपंग, दिन,,दुबळे, , अडलेला,नडलेला, गरजवंत,यांची निस्वार्थ पणे,मदत सेवा करतात, मदतीला धावून येतात,,पद प्रतिष्ठा, विचारत घेत नाही, सर्वांनाच मदत करतात असे डॉक्टर श्री. राहुल जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण प्रसंगी कडुलिंब, बदाम, कंरज,उंबर,वड अशा ८ फुटी देशी वृक्ष लावुण वाढदिवस साजरा करण्यात आला.
पुढे बोलताना अमित जगताप म्हणाले की मानवाच्या सुखी जीवनासाठी सभोवतालचे वातावरण, पर्यावरण सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. पर्यावरण हा विषय अत्यंत महत्त्वाचा असूनही शिक्षण प्रणालीत पर्यावरण या विषयाला महत्त्व दिले जात नाही व केवळ परीक्षेत पास होण्यापुरतेच याला महत्त्व दिले जाते. भविष्यात विद्यार्थ्यांनी व तरुणाईने पर्यावरणासाठी काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे. असेही आवाहन जगताप यांनी केले.
या वेळी डॉ.राहुल जगताप, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप ,ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, हवेली तालुका संपर्क प्रमुख विनोद यादव, जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, अभिषेक शेंडगे, मेघराज शेंडगे, दिपक महानवर, भाऊसाहेब कोळपे,मगेश कोळपे तसेच ग्रीन फाऊंडेशन, लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते.

