shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रदीप गाडेकर सरांचा चढता आलेखासह वाढदिवस संपन्न...!


*प्रदीप गाडेकर सर म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व व वक्तृत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले व्यक्तिमत्व.

*क्रिकेट विश्वात फलंदाजी, गोलंदाजी, यष्टिरक्षण यात अत्यंत तरबेज खेळाडू म्हणजे गाडेकर सर,,, खो खो मध्ये कुणाच्याही हाती न लागणारे अतिशय वेगवान झंझावाती खेळाडू..

*गाडेकर सरांना अध्यात्मिक क्षेत्राची विशेष आवड असून शेकडो श्लोक त्यांना मुखोद्गत पाठ आहेत...सरांचा आहार, आचार, विचार अतिशय शुद्ध आणि सात्विक आहेत.

*समर्थ शैक्षणिक संकुलाच्या स्थापनेपासून अत्यंत सचोटीने, प्रामाणिकपणे आणि मन लावून काम करणाऱ्या गाडेकर सरांचा  संस्थेच्या यशस्वीतेत आणि जडणघडणीत खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा आहे.

 *गाडेकर सरांना शिक्षणाविषयी विशेष आस्था असून दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायांसंदर्भातील त्यांचे मार्गदर्शन व समुपदेशन नेहमीच गरजू विद्यार्थ्यांना मिळत असते.

*सरांचा आवाज अतिशय गोड, मंजुळ व मधुर असून ते भजनात सुमधुर गाणी गातात... नाना पाटेकर व निळू फुले आदी कलाकारांचे अगदी हुबेहूब संवाद ते मिमिक्री म्हणून सादर करतात.

*सर्वांशी प्रेमाने, अदबीने, हळुवारपणे, समजूतदारपणे आणि समंजसपणाने वागणारे गाडेकर सर म्हणजे साक्षात अत्युत्तम गुणांची खाणच आहेत.

*गाडेकर सर सर्व मित्र परिवाराच्या सुख दुःखात नेहमीच आवर्जून उपस्थित असतात... नकारात्मकतेच्या डोहात बुडालेल्या व्यक्तींना त्यांच्या सकारात्मक समुपदेशनातून आशेच्या  सकरात्मकतेच्या  किनाऱ्यावर आणण्याचे महत्कार्य गाडेकर सर लीलया पार पाडतात.

*अष्टपैलू, बहुगुणी, बहुआयामी आमचे परमप्रिय, परमस्नेही मित्र, समर्थ कॉलेज चे आदर्श व  कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी आदरणीय प्रदीप गाडेकर सर आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
🌹🎂🌹🎂🌹🎂🌹

शुभेच्छुक
नामदेवराज पवार
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, जुन्नर तालुका अध्यक्ष.
मो- 9860861859
close