शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
समाजकल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका करणाऱ्या देशाच्या नामांकित संस्थेतील विद्यार्थी १२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. https://bit.ly/3MulwsO निवड झालेल्या शंभर विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च समाजकल्याण विभाग करणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत अनुसूचित जाती, नवबौद्ध विद्यार्थी उतरावे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, त्यांचा दर्जा सुधारावा, गरिबीमुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित न राहता समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. . या उदात्त हेतूने समाजकल्याण विभाग राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती वर्ष २०२२-२३ देणार आहे. त्यासाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला इच्छुकांनी भेट द्यावी.

