shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी शंकरराव पाटील यांना पतंजली कडून अभिवादन...

  • कर्मयोगी शंकरराव पाटील यांना पतंजली कडून अभिवादन
  •  पुण्यतिथीच्या निमित्ताने आचार्य बालकृष्णजी वृक्षमित्र पुरस्कारचे वितरण...

 
इंदापूर प्रतिनिधी:
स्वर्गीय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या सोळाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज पतंजली योगा परिवार व युवा भारत यांच्या वतीने शाळा नंबर एक व दोन येथे सुरू असलेल्या स्थायी योगवर्गामध्ये अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अॅड अशोकराव कोठारी  तर प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष अशोकबापू इजगुडे ,सामाजीक कार्यकर्ते हमीदभाई आतार उपस्थित होते.
      
पहाटेच्या योग सत्रामध्ये सुरुवातीला संगीतावर योगसाधना करण्यात आली त्यानंतर प्रमुख मान्यवर आणि योग साधकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि सर्व योगसाधकांच्या वतीने भाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी अशोक इजगुडे आणिअॅड अशोकराव कोठारी यांनी  योगसाधकांना भाऊंचे जुने गांधीवादी अनेक किस्से यावेळी सांगितले भाऊंच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय भाऊ हे सुद्धा यांना सुद्धा व्यायामाची आवड होती आणि ते नेहमी योगासने आणि प्राणायाम करत असल्याचे सांगण्यात आले..
 
    
भाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त निमित्ताने इंदापूर शहरांमध्ये इंदापूर ऑक्सिजन पार्क म्हणजेच बायोडायव्हर्सिटी, जडीबुटी उद्यान याची निर्मिती करणारे इंदापूर नगरपालिकेचे कर्मचारी यांना आचार्य बालकृष्णजी वृक्ष मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बायोडायव्हर्सिटी हे इंदापूर शहराचे ऑक्सिजन पार्क असून त्या ठिकाणी दुर्मिळातील दुर्मिळ वनस्पतींची लागवड आणि जतन करण्याचे काम अशोक चिंचकर आणि त्यांच्या सर्व टीमने केल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार या ठिकाणी करण्यात आला.

तसेच जागतिक योगा फोटो अल्बम मध्ये ज्यांचे फोटो सिलेक्ट झाले अशा योगशिक्षकांनाही  केंद्र सरकारकडून मिळालेल्या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने घेण्यात आलेल्या योगा टीचर अँड इव्होल्यूटर या परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल आयुर्वेदाचार्य मल्हारी घाडगे आणि योगशिक्षक प्रशांत गिड्डे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी चंद्रकांत देवकर यांनी हास्यासन घेत शांति पाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र परबत यांनी तर आभार प्रदर्शन कुस्तीपंच श्री शरद झोळ यांनी केले  
आचार्य बालकृष्णजी  वृक्षमित्र पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला १) अशोक गजानन चिंचकर २)लीलाचंद अर्जुन पोळ ३)सुनील दिगंबर लोहिरे ४) दीपक देविदास शिंदे ५) चंद्रकांत विलास शिंदे ६)अंबादास महादेव नाळे ७) शेखर हनुमंत लोंढे ८)अभिनंदन चंद्रकांत सावंत.


  आजच्या या कार्यक्रमासाठी पतंजली योगा परिवाराचे अॅड जालिंदर बसळे अॅड विकास देवकर श्री प्रकाश शिंदे श्री जयकुमार शिंदे  श्री.युवराज आप्पा राऊत श्री. पवनजी धुमाळ तालुका कृषी अधिकारी देविदास सारंगकर, पियुष बोरा, किसन पवार, बिभिषन खबाले ,रामेश्वरजी साठे, अण्णासाहेब चोपडे, भालचंद्र भोसले,देवराव मते,गोकुळ हराळे विकास खिलारे!शंकर काशीद डाॅ. विक्रम पोतदार काशीनाथ पारेकर, सुनिल देवळालीकर, महिला योग समितीच्या सायरा आतार, मेघा भंडारी,रेखा भंडारी ,उज्वलाताई घोगरे यांचेसह अनेक योगसाधक उपस्थित होते.
close