कुंपणच जेव्हा शेत खाते तेव्हा....?
ज्यांच्याकडे गावातील प्रथम नागरिक म्हणून पाहीले जाते .., गावाची संपुर्ण जबाबदारी त्यांचेकडे असते. अशा जबाबदार गावाचे लोकनियुक्त सरपंच व्यक्ती कडून खूनासारखे घटना घडत असतील तर गावातील नागरिकांनी काय बोध घ्यायचा... ? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे.
शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
नेवासा : - नेवासा तालुक्यातील मौजे चिलेखन वाडीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच प्रा.भाऊसाहेब धोंडीराम सावंत यांच्यावर पत्नीला जीवे ठार मारल्याचा गुन्हा र.न. ८४४/२२ भादवी ३०२,२०१,१७६/३५ कलमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, नामें १)भाऊसाहेब धोंडीराम सावंत, भेंडा बु । २)निलेश भाऊसाहेब सावंत,भेंडा बु ।, ३) चंद्रकला आत्माराम चोपडे रा.चिलेखनवाडी, ४)शाहाबाई सोपान चोपडे रा.चिलेखनवाडी ता.नेवासा या आरोपींनी दिनांक २१/१०/२०२१ रोजी लांडेवाडी भेंडा बु । येथे चिलेखन वाडीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब धोंडीराम सावंत यांनी स्वतःची पत्नी नामे पद्मावती भाऊसाहेब सावंत यांना साथीदारसह पोटात लाथाबुक्क्यांनी जोरदारपणे मारहाण करून व टणक वस्तूंने जीवे ठार मारले.
त्यानुसार वर्षभर पोलिस यंत्रणांनी तपास लावून मुंबई (भायखळा) येथील जे जे रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथील पिएम रिपोर्टमध्ये लाथाबुक्क्यांनी पोटात जोरदार पणे मारहाण करून टणक वस्तूंने ठार मारल्याचा पुरावा आढळल्याने व तपासात सदर आरोपींनी गुन्हा केल्याचे आढळून आल्यानंतर नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भाटेवाल यांनी फिर्यादी होऊन सदर आरोपींवर आज दि. ३०/०९/२०२२ रोजी गु.र.नं.८४४/२२ भादवी ३०२,२०१,१७६/३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपींचा पोलिस श़ोध घेत आहेत.

