shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोंडला हा महिलांना आनंदाचा आणि प्रेरणेचा दिवस - खासदार सुप्रियाताई सुळे.

भोंडला हा  महिलांना आनंदाचा आणि प्रेरणेचा दिवस - खासदार सुप्रियाताई सुळे.

खा. सुप्रियाताई सुळे, सारिकाताई भरणे, चित्रलेखा ढोले  इतर महिला व विद्यार्थिनी घेतला भोंडला खेळाचा आनंद.
इंदापूर प्रतिनिधी:भोंडला हा  महिलांना आनंदाचा आणि प्रेरणेचा दिवस असतो. असे उद्गार खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लाखेवाडी येथील जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी यांच्यावतीने शारदीय नवरात्र उत्सव २०२२ यानिमित्ताने महा भोंडला व महिला मेळावा याचे आयोजन (दि. २८ सप्टेंबर) रोजी करण्यात आले होते त्यावेळी त्या म्हणाल्या. 
या कार्यक्रमास  आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रताप पाटील ,सचिन सपकळ ,दीपक जाधव ,शिवाजी तरंगे, छायाताई पडसळकर, शुभम निंबाळकर व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, भोंडला हा  महिलांना आनंदाचा आणि प्रेरणेचा दिवस असतो. आम्ही आयुष्याच्या छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी असतात त्याच्यापासून अनेक वेळा त्यापासून वंचित राहतो परंतु चित्रलेखाताईंच्यामुळे भोंडला खेळण्यास मिळणार .देशाच्या कुठल्याही मोठ्या शहरात अशी वास्तू असेल अशी येथे उभारली आहे.या कुटुंबीयांनी शिक्षणाचे महत्त्व एक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून केले आहे. तुमच्यासमोर मी भाषण करते आहे मी खासदार आहे त्याचे कारण चांगल्या संस्थेत शिकले कुटुंबाचे चांगले संस्कार आणि चांगले शिक्षण घेतले. तुम्हाला सरांच्या आणि ताईंच्यामुळे चांगले शिक्षक आणि मित्र मिळतात त्याचा पूर्णपणे उपयोग करा अभ्यास करा तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर चांगले वाचन करा अभ्यास करा सर्व गुण संपन्न बना अशा शब्दात त्यांनी उपस्थित महिला व विद्यार्थिनींना संबोधित केले.

तसेच माझी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, खूपच चांगला कार्यक्रम जय भवानी गड विकास प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष श्रीमंत ढोले उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले यांच्या प्रयत्नातून घेतला त्यांना मनापासून आभार मानून सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो .

याप्रसंगी  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारडकर, संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले यांनी मनोगत व्यक्त केले.
close