शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२२
श्रीरामपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्री.शंकरराव बाळाजी आगे अनंतात विलिन..!!
श्रीरामपूर : श्रीरामपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष,दै.जय बाबा व विठ्ठल प्रभा वर्तमानपत्राचे संस्थापक,भारत सरकार नोटरी,ॲडव्होकेट श्री.शंकरराव बाळाजी आगे यांचे काल दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०८:४५ वा वृद्धापकाळाने वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखद निधन झाले.काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अमरधाम श्रीरामपूर शहर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी स्वर्गवासी शंकरराव आगे यांच्यावर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी उपस्थित होता.
दैनिक जय बाबाचे मनोजकुमार आगे,बाळासाहेब आगे, एडवोकेट कैलास आगे यांचे ते वडील होते.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,नातवंडे व पंतवंडे असा मोठा परिवार आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

