shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हेमंत मुसरीफ यांच्या छान‌ कविता..

चवथी माळ ..

चवथी माळ जपता 
आगळी येते स्फुर्ती
स्मित हास्य  करता
करे ब्रह्मांड निर्मीती

सर्वांत तेजस्वी  रुप
त्रिखंडा तिची किर्ती
सिंहा रुढ महामाया
सूर्य मंडळात वसती

अष्ट भुजा  आदिती
आयुधे  शोभे  हाती
मुखकमल ओजस्वी
उजळे सहस्त्रज्योती

प्रिय  तिज कोव्हळा
भक्तांवर अति प्रिती
साधक मन  मग्न हो
अनाहत चक्र स्थिती

गरबा दांडिया खेळा
फुले सुरेख  संस्कृती
संपून  जाता  दुरावा
जोडली  जाती नाती

आईचा  जयघोष हो
अचंचल  मनाआरती
जगदंबा   शरणागती
मनी जागृत  आकृती


2)

जगजननी ..

जगजननी कुष्मांडी
ओवली चवथी माळ
तूचं निर्मीले  ब्रह्मांड
नमन करे तुज काळ

अष्टभुज शस्त्रसज्ज
करी लेकरा सांभाळ
उग्र सिंहावर आरूढ
तरी  हसणे लोभाळ

जनाऊ बनली माती
घुसला कृपेचा फाळ
अंकुरले  बीज  गोड
धारा  बरसे आभाळ

माय लेकराची छान
जडवी घडवी  नाळ
फुले  गुंफता  दोरात
बनली  सुरेख  माळ

नरनारी हा भेदाभेद
पाप  आमचे वंगाळ
स्त्रि अवमानीत करे
चालले उगा गु-हाळ

महिला दुर्बला  मानी
करी  सदैव आबाळ
तोल  घसरे  वारंवार
जननी  तुचं सांभाळ

-
3)

कुष्मांडीमा ..

जगन्माता कुष्मांडी
ओवलीचवथी माळ
तूचं  निर्मीले ब्रह्मांड
नमनकरे तुज काळ

जन्म जरा अन् मृत्यू
सगळे  तुझेचि  खेळ
तुझेच गुलाम गं माते
रात्र दिस  काळ वेळं

नरनारी निर्मी दोन्ही
गुंफत उचीत गं मेळ
स्त्रीला जनन्  शक्ती
गं तीचं निर्मिते फळ

अबला केली सबला 
देऊन विशेष हे बळ
कळले  ना आम्हांस
म्हणतो  नारी  दुर्बळ

विनंती आई  तुजला
मने  करी गा  निर्मळ
विसरावे भेद भाव हे
सुखी समृद्ध  सकळ

अष्टभुजाशस्त्रसज्जा
स्वर्ग तव पायाजवळ
चुकले जरी माफ कर
लेकरे तुझी अवखळ


4)

कुष्मांडा आई ..

मंतरल्या  दिवसांचा
नवरात्रींचा  सोहळा
नव रात्री  नऊ रुपडे
सुखानंदाचा  दर्वळा

कुष्मांडा नाम करण
चतुर्थ  दिनी आगळा
ब्रह्मांड निर्मिले  तिने
सोसल्याअनंत कळा

अलौकिक तेजःपुंज 
वसतीला सूर्यमंडळा
अंधारा देत  उजाळा
किरणे दिले तेजाळा

जीवन मृत्यू फे-यात
जिंकले  कळिकाळा
भक्त वत्सल माताश्री
जीवन दायक  बाळा

आसनस्थ सिंहासनी
असूर शरण भयाळा
अष्टभुजा रक्षा करते
शांतादुर्गा ती दयाळा

सुवर्ण गात्री मायअसे
रंग आवडता पिवळा
प्रसाद मिळे  सकळा
नैवेद्या  ठेवा कोहळा

- हेमंत मुसरीफ पुणे.
  ९७३०३०६९९६.
  www.kavyakusum.com

close