प्रतिनिधी : सचिन गांधी
नगर : २६ / आदिशक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या देवीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. नवरात्रोत्सवाला आज सोमवारपासून सुरूवात होत आहे. राज्यात तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका, हे तीन पूर्ण शक्तिपीठं तर वणीची सप्तशृंगी हे अर्ध शक्तीपीठ मानले जाते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आज घरोघरी घटस्थापना करण्यात येत आहे. स्त्रीला अन्यायाविरोधात लढण्याची शक्ती मिळावी म्हणूनही नऊ रात्री देवीचा जागर करण्यात येतो.
नगर शहरातील सातपुते तालीम जवळील मुंजोबा चौक येथील नावाजलेल्या नालेगाव प्रतिष्ठान येथे दरवर्षी प्रमाणे सर्व महिला व युवकांच्या नेतृत्वाखाली मंडळामार्फत देवीची मुर्ती स्थापना करून घटस्थापना उत्साहाने करण्यात आली.
यावेळी परिसरातील सर्व नागरिक , महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

