शेवगांव ( प्रतिनिधी) : येथील नानासाहेब भारदे मराठी शाळेत "शिक्षक - माता,पालक मेळावा" निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या,
शाळेत विद्यार्थ्यांच्या तर नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धा या होतच असतात तथा शिक्षक - पालक मेळावेही घेण्यात येतात,मात्र यावेळी शिक्षक - पालक मेळाव्या निमित्त घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आणि
त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असलेले आई - वडील, हा अनोखा उपक्रम सर्वांना अचंबित करणारा ठरला.
यावेळी संगीत खुच्री, टिकली लावणे ,एका काडीत मेणबत्ती पेटविणे,रांगोळी स्पर्धा यात सगळ्याच माता - पालकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. रोजच्या कामातून काहीतरी वेगळेपणा यावा व आनंद निर्माण व्हावा हाच या उपक्रमा मागचा हेतू होता.या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पठाण मॅडम व श्रीमती कटके मॅडम, श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती. गुंजाळ मॅडम,श्री.शिंदे सर या सहकारी शिक्षकांनी मेहनत घेतली.
संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे, संस्थेचे सचिव शामकाका भारदे, सहसचिव हारिष भारदे ,शाळा समिती अध्यक्षा सौ.रागिनिताई भारदे यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमबद्दल आनंद व्यक्त केला.व वेळात वेळ काढून आलेल्या माता - पालकाचे शाळा व्यवस्थापनाकडून स्वागत करण्यात आले.आ

