खासदार शरद पवार यांनी शहा कुटुंबीयांची घेतली सांत्वन पर भेट.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष तथा स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांचे खंदे समर्थक गोकुळदास( भाई )विठ्ठलदास शहा यांचे शनिवारी दिनांक १० सप्टेंबर रोजी निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी इंदापूर येथील शहा कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शहा कुटुंबीयांतील मुकुंद शहा, भरत शहा, अंकिताताई शहा, अंगद शहा व इतर सदस्य होते.
यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे नंदकुमार गुजर व इतर उपस्थित होते.

